हल्दानी : वाढदिवसाच्या पार्टीत चेहऱ्यावर केक लावल्याने दोन गटात तुफान हाणामारी केल्याची घटना उत्तराखंडमधील हल्दानीमध्ये घडली आहे. दोन गटातील फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कुणीही याप्रकरणी तक्रार न दिल्याने कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मुखानी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या उंचापूल परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.