गृहमंत्र्यांच्याच मतदारसंघात हत्येच्या 2 घटना उजेडात, मृतांपैकी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, आंबेगाव तालुक्यात खळबळ

गृहमंत्र्यांच्याच मतदारसंघात हत्येच्या 2 घटना उजेडात, मृतांपैकी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, आंबेगाव तालुक्यात खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सचिन जाधव यांची हत्या

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघात हत्येच्या दोन घटना समोर आल्या आहेत.

सागर जोशी

|

May 26, 2021 | 10:04 PM

पुणे : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघ बुधवारी हत्येच्या दोन घटनांनी हादरला. पहिल्या घटनेत आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लेबर कॉन्ट्रॅक्टर सचिन जाधव यांची हत्या झाल्याचं समोर आलेला आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये द्रोपदाबाई गिरे यांचा मृतदेह डोक्यावर इजा झाल्याच्या अवस्थेत आढळून आलेला आहे. हत्येच्या या दोन घटनांमुळे आंबेगाव तालुका हादरुन गेलाय. (two murders on the same day in Ambegaon)

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लेबर कॉन्ट्रॅक्टर सचिन जाधव यांची पैशाच्या देवाणघेवाणीतून हत्या झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी रात्री ही हत्या करण्यात आलीय. मयत सचिन जाधव हे घरी न आल्याने याच्या नातेवाइकांनी मंचर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आरोपी बाळशिराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी मयत सचिन जाधव याचे पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन मोठा वाद झाला होता. मयत सचिन जाधव हे दिलेले पैसे परत करत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून यांच्यात वाद सुरु होता.

मृतदेह दरीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

या वादातूनच मंगळवारी रात्री बाळशिराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांनी सचिन जाधव यांची हत्या केली. सचिन जाधव यांचा मृतदेह त्यांच्यात गाडीमध्ये मृतदेह टाकला आणि गाडी अहमदनगर आणि पुण्याच्या सीमेलगत असलेल्या अहमदनगर मधील कोरथन घाटामध्ये खोल दरीत सोडून दिली. इतकंच नाही तर आरोपींनी गाडी पेटवून देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं चौकशीत समोर आलंय. याप्रकरणी दोनही आरोपींना अटक करण्यात आली असून, यात अजून कुणाचा सहभाग आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

थोरांदळे गावात महिलेची हत्या

हत्येची दुसरी घटनाही आंबेगाव तालुक्यामधील थोरांदळे या गावाजवळ घडली आहे. द्रोपदाबाई गिरे (वय 32) यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांच्या मृतदेह डोक्यावर इजा झालेल्या अवस्थेत आढळून आलाय. द्रोपदाबाई या अहमदनगरच्या आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात वास्तव्याला होत्या. हाताला मिळेल ते काम करून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. द्रोपदाबाई यांना एक फोन आला, त्या बोलण्यासाठी घराबाहेर पडल्या आणि बराच वेळ त्या घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेतला असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, अद्याप आरोपीचा शोध लागू शकला नाही. गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच राजरोसपणे हत्या होत असल्याने त्यांच्या हाती राज्य सुरक्षित आहे का?, असा सवाल आता विरोधत करत आहेत.

इतर बातम्या :

शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरणाऱ्या टोळीच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, 10 ट्रॅक्टरसह एकूण 20 वाहने जप्त

अमेरिकेत बसून पतीने भारतातील बायकोला संपवलं, दुचाकी अपघातात मृत्यूचा बनाव

two murders on the same day in Ambegaon

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें