बीडमधील चार प्रतिष्ठित प्राध्यापकं, पण शिक्षकी पेशाला काळीमा फासणारं कृत्य, दोघांना बेड्या, दोघं फरार

आष्टी येथील एका महाविद्यालयातील चार प्राध्यापकांवर गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या चारही प्राध्यापकांनी खोटे दस्तावेज तयार करुन तब्बल 104 एक्कर इनामी जमीन हडप केली होती.

बीडमधील चार प्रतिष्ठित प्राध्यापकं, पण शिक्षकी पेशाला काळीमा फासणारं कृत्य, दोघांना बेड्या, दोघं फरार
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 12:15 AM

बीड : आपण शिक्षकांना गुरु मानतो. त्यांचा आदर करतो. शिक्षकांना समाजात आदाराने बघितलं जातं. त्यांचा सर्वजण आदर करतात. वर्गातल्या खोडकर मुलापासून ते हुशार मुलांपर्यंत सर्वचजण शिक्षकांना दचकून असतात. तसेच समाजात शिक्षकांना चांगली प्रतिष्ठा दिली जाते. त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार केला जातो. पण बीडच्या आष्टी तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. आष्टीमधील चार शिक्षकांनी केलेलं कृत्य हे शरमेने मान घालवणारं असंचं आहे. या शिक्षकांनी इनामी जमीन हडपली होती. विशेष म्हणजे चारही आरोपींमध्ये प्रतिष्ठित प्राध्यपकांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच आरोपींच्या या कृत्यामुळे शिक्षकीपेक्षाला काळीमा फासली गेली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आष्टी येथील एका महाविद्यालयातील चार प्राध्यापकांवर गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या चारही प्राध्यापकांनी खोटे दस्तावेज तयार करुन तब्बल 104 एक्कर इनामी जमीन हडप केली होती. याप्रकरणी गावातील एका नागरिकाने तक्रार दिल्यानंतर आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोन प्राध्यापकांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोन प्राध्यापक फरार आहेत. हे सर्व आरोपी भाजप नेते भीमराव धोंडे यांच्या महाविद्यालयातील आहेत.

सरपंचावरही गुन्हा दाखल

एक सरपंच आणि अन्य एका व्यक्तीसह प्राध्यापकांवर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही सर्व जमीन नालकोल येथील शेख महंमद बाबा यांची आहे. या खोट्या दस्तऐवजावर साक्षीदार म्हणून रुई नालकोल गावाचे सरपंच संजय तसेच याच गावाचे रहिवासी शरद नानाभाऊ पवार यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या.

दीड वर्षांपासून स्थानिकांचे कारवाईसाठी आंदोलने

आरोपी अजिनाथ बोडखे, गोपीनाथ बोडखे, मुस्ताक शेख हे कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. चौथे आरोपी सुरेश बोडखे हे आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टीचे मुख्याध्यापक आहेत. गेल्या दीड वर्षांपासून या प्रकरणात नागरिकांनी अनेक आंदोलन आणि मोर्चे काढले होते. अखेर गावकऱ्यांना न्याय मिळाला आहे.

हेही वाचा :

औरंगाबादमध्ये तरुणांचा राडा, बारमधलं गाणं बंद केल्याचा राग, हॉटेल व्यवस्थापकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणात अखेर 8 वर्षांनी आरोपनिश्चिती होणार, कोर्टात नेमकं काय-काय घडलं? वाचा सविस्तर

सून-सासऱ्याच्या प्रेम कहाणीचा करुण अंत, प्रेमासाठी चार महिन्यांपूर्वी घराबाहेर पडले, पण अचानक…

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.