नवरात्रीनिमित्त सोसायटीच्या मैदानात रहिवाशांची गर्दी, इतक्यात 18 व्या मजल्यावरुन तरुणी कोसळली

शनिवारी संध्याकाळी जवळपास 7 वाजताच्या सुमारास तरुणीने 18 व्या मजल्यावरुन उडी मारली. कुटुंबीयांनी गंभीर जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.

नवरात्रीनिमित्त सोसायटीच्या मैदानात रहिवाशांची गर्दी, इतक्यात 18 व्या मजल्यावरुन तरुणी कोसळली
प्रातिनिधीक फोटो

नवी दिल्ली : ग्रेटर नोएडामधील एका टोलेजंग इमारतीतून खाली पडून तरुणीचा मृत्यू झाला. बिल्डिंगच्या 18 व्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणीने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. शनिवारी नवरात्री निमित्त सर्व जण सोसायटीत खाली जमले असताना तरुणी पडली.

मुलीच्या नातेवाईकांनी तिला एका खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या बिसरख पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

नेमकं काय घडलं?

ही घटना ग्रेटर नोएडा पश्चिमेच्या लॉ रेसिडेन्सी सोसायटीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील टॉवर क्रमांक 8 मध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील सर्वात धाकट्या मुलीने शनिवारी संध्याकाळी जवळपास 7 वाजताच्या सुमारास 18 व्या मजल्यावरुन उडी मारली. पूर्वी हे कुटुंब टॉवर क्रमांक 11 मध्ये राहत होते. कुटुंबीयांनी गंभीर जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.

आत्महत्येमागील कारणांचा पोलीस तपास

ही घटना घडली तेव्हा सोसायटीतील रहिवासी खाली फिरत होते. नवरात्रोत्सवामुळे सोसायटीमध्ये अनेक जण जमले होते. घटनेनंतर तरुणीच्या मृतदेहाजवळ मोठी गर्दी जमा झाली. तरुणी 20 वर्षांची आहे. आत्महत्येमागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत. विशेष म्हणजे, ग्रेटर नोएडा पश्चिम भागातील उंच बिल्डिंगमधून आत्महत्या होण्याची प्रकरणं वाढताना दिसत आहेत.

जिम प्रशिक्षकाची इंदौरमध्ये आत्महत्या

दुसरीकडे, जिम प्रशिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. धाकटा भाऊ क्रिकेट खेळण्यासाठी बोलवायला त्याच्या खोलीत गेला, तेव्हा हा प्रकार समोर आला होता. माझ्या दोन्ही बहिणींना माझा चेहरा दाखवू नका, तसंच माझ्या प्रेयसीला अंत्यसंस्काराना बोलवू नका. माझी ही अंतिम इच्छा पूर्ण केली नाहीत, तर माझी आत्मा फिरत राहील, असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. मध्य प्रदेशातील इंदौर शहरात कँटोन्मेंट परिसरात हा प्रकार घडला होता.

धाकट्या भावाने सर्वप्रथम मृतदेह पाहिला

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. संयोगितागंज पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणाचे नाव गोपाल वर्मा आहे. तो जिम ट्रेनर होता. गोपालला नितेश आणि अंकुश असे दोन भाऊ आहेत. घटनेच्या वेळी त्याचे आई -वडीलही घरात होते. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी त्याचा भाऊ नितेशने फासावर लटकलेल्या अवस्थेत पाहिला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु त्याचा मृत्यू झाला होता.

चुलत बहिणींशी वाद

जिम प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गोपाळचे काम काही महिन्यांपासून बरे चालले नव्हते. तसेच गेल्या काही काळापासून त्याच्या काकांच्या कुटुंबासोबत मालमत्तेवरुन वाद सुरु होते. त्याच्या काकांना दोन मुली आहेत, ज्यांचे लग्न झाले आहे. या वादात त्याच्या दोन्ही चुलत बहिणीही मध्ये पडत होत्या. यामुळे तो चुलत बहिणींवरही काही दिवस रागावला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त केली आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं आहे?

“मी जे करत आहे, स्वतःच्या मर्जीने करत आहे. माझी शेवटची इच्छा हीच आहे की माझ्या दोन्ही बहिणी गोलू आणि मुन्नू यांना माझा चेहराही दाखवू नका. माझी त्या दोघींवर कोणतीही नाराजी नाही. मी जे करत आहे, स्वतःच्या मर्जीने करत आहे. प्रिती सिलावटलाही माझ्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ देऊ नका, हीच माझी अंतिम इच्छा आहे, ती पूर्ण केली नाही, तर माझा आत्मा कायम भटकत राहील. बाकी या कोणावर माझी नाराजी नाही.” असं गोपालने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

संबंधित बातम्या :

सात जणांची नावं, सुसाईड नोट सेफ्टी पिनने गाठोड्याला अडकवली, कोल्हापुरात महिलेची नदीत आत्महत्या

ठाण्यात महिलेचा गळफास, आत्महत्येपूर्वी मैत्रिणींना व्हिडीओ पाठवून पतीवर धक्कादायक आरोप

भाजयुमोच्या 28 वर्षीय नेत्याची आत्महत्या, नस कापून गळफास, सुसाईड नोटमध्ये प्रेयसीवर आरोप

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI