Raid | गुटखा व्यापाऱ्याच्या घरी छापा, बेड बॉक्समध्ये 6.31 कोटी रोकडा, रात्र उलटली तरी अधिकारी पैसेच मोजत

पथकासोबत आलेल्या उपायुक्तांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यांनी एवढेच सांगितले की, सहआयुक्तांनी सर्च वॉरंट दिले होते, त्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

Raid | गुटखा व्यापाऱ्याच्या घरी छापा, बेड बॉक्समध्ये 6.31 कोटी रोकडा, रात्र उलटली तरी अधिकारी पैसेच मोजत
कानपूरमधील गुटखा व्यापाऱ्याच्या घरावर छापाImage Credit source: ट्विटर
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 10:48 AM

हमीरपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime) हमीरपूरमध्ये 12 एप्रिल रोजी केंद्रीय वस्तू सेवा कर अर्थात जीएसटी (GST) पथकाने गुटखा व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकला. या छाप्यात गुटखा व्यापारी जगत गुप्ता यांच्याकडून 6 कोटी 31 लाख 11 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे ही रोकड गुटखा व्यापाऱ्याने बेड बॉक्समध्ये ठेवले होते. रोख रकमेची मोजणी करण्यासाठी स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तीन मशिन आणि एक मोठी ट्रंक आणली होती. तब्बल 18 तासांच्या मोजणीनंतर ट्रंकमध्ये भरुन रक्कम घेऊन जाण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

पथकासोबत आलेल्या उपायुक्तांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यांनी एवढेच सांगितले की, सहआयुक्तांनी सर्च वॉरंट दिले होते, त्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

जगत गुप्ता यांच्या घरावर छापा

केंद्रीय वस्तू सेवा कर पथकाने सुमेरपूर शहरातील पोलीस ठाण्याजवळ राहणारा गुटखा व्यापारी जगत गुप्ता यांच्या घरावर छापा टाकला. 15 सदस्यीय पथकाने 12 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता सुरु केलेली ही छापेमारी 13 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत सुरु होता. रात्री उशिरा बँकेचे कर्मचारीही पैसे ठेवणाऱ्या तीन मोठ्या ट्रंकांसह पोहोचले होते.

कोट्यवधींची अफरातफर केल्याचा आरोप

पैसे भरून ट्रंक स्टेट बँक हमीरपूर येथे पाठवण्यात आली आहे. जीएसटी दस्तऐवजात व्यापाऱ्याने केलेली अफरातफर वेगळीच, मात्र फक्त पेट्यांमधील रक्कम कोट्यवधींमध्ये असल्याचा सध्या अंदाज वर्तवला जात आहे. सेंट्रल गुड्स सर्व्हिस टॅक्सच्या टीमसोबत आलेल्या उपायुक्तांनी एवढंच सांगितलं की, त्यांना सर्च वॉरंट सहआयुक्तांनी दिले होते, त्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

औरंगाबादेत 12 लाखांचा गुटखा जप्त, मुकुंदवाडीत पोलिसांची मोठी कारवाई, तिघे ताब्यात

बनावट दारूच्या बॉटलचे झाकण बनवणाऱ्या कंपन्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Crime | बीडमध्ये हवाला रॅकेट उध्वस्त, लाखोंची बेहिशेबी रक्कम जप्त, तिघांना बेड्या!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.