Unnao Murder Case | पीडित कुटुंब नजर कैदेत, कुणालाही भेटण्याची परवानगी नाही

घटनेनंतर पोलीस प्रशासनाने पूर्ण घटनास्थळाला सील केलं आहे. त्यासोबतच पीडित कुटुंबालाही नजर कैद केलं आहे.

Unnao Murder Case | पीडित कुटुंब नजर कैदेत, कुणालाही भेटण्याची परवानगी नाही
Unnao murder Case

लखनऊ : उत्तर प्रदेशातील उन्नाव (Unnao) येथे बुधवारी रात्री शेतात तीन दलित अल्पवयीन मुली (Victim Family Not Allowed To Meet Anybody) ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यापैकी दोघींचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर प्रशासन अलर्ट झालं आहे. घटनेनंतर पोलीस प्रशासनाने पूर्ण घटनास्थळाला सील केलं आहे. त्यासोबतच पीडित कुटुंबालाही (Victim Family) नजर कैद केलं आहे. कुणालाही त्यांना भेटण्याची किंवा त्यांच्याशी बोलण्याची परवानगी नाही. मीडियालाही आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलेलं नाही (Victim Family Not Allowed To Meet Anybody).

पोलीस महासंचालक (IG) लक्ष्मी सिंहच्या टीमने या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केलीये. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकरणाची गंभीरता पाहता पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पोलिसांना या प्रकरणी कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करायचा नाहीये. या प्रकरणाच्या तपासासाठी सहा टीम तयार करण्यात आल्या आहेत. आईजी लक्ष्मी सिंहने हे प्रकरणाचा छडा लवकर लावण्याचा दावा केला आहे.

गावात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात

या प्रकरणा पोलिसांकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव गावात मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. दोन मुलींच्या मृत्यूनंतर रात्री उशिरा लखनऊच्या पोलीस महासंचालक लक्ष्मी सिंह घटनास्थळी पोहोचल्या. दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे तर एकीची प्रकृती गंभीर आहे. तिला उपचारासाठी कानपूरच्या रेजेन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे (Victim Family Not Allowed To Meet Anybody).

कुटुंब नजर कैदेत

या घटनेनंतर जिल्ह्याच्या उच्चाधिकारी जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पोहोचले. जिथे त्यांनी पीडित मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. पणस मुलगी शुद्धीवर नव्हती. त्यामुळे अद्याप या प्रकरणी कुठलीही माहिती पुढे आलेली नाही. प्रकरणाची गंभीरता पाहता पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्यांनी पीडित कुटुंबाला पूर्णपणे नजर कैदेत ठेवलं आहे. जेणेकरुन ते सुरक्षित राहावे.

Victim Family Not Allowed To Meet Anybody

संबंधित बातम्या :

हिंगणघाट जळीतकांड सुनावणी : आरोपीने प्राध्यापिकेला घटनेच्या दोन महिन्यापूर्वीही रस्त्यात होतं अडवलं

पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम

VIDEO| धक्कादायक! चार तृतीयपंथीयांची वाहतूक पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI