तीन खड्ड्यात तब्बल 56 लाखांच्या नोटा पुरल्या, गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या विजय गुरनुलेला बेड्या

शेअर ट्रेडिंग आणि रिअल इस्टेटमध्ये मल्टिलेव्हल मार्केटिंगचा फंडा सांगून देशभरातील गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विजय गुरनुले या ठकबाजाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

तीन खड्ड्यात तब्बल 56 लाखांच्या नोटा पुरल्या, गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या विजय गुरनुलेला बेड्या
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 12:21 PM

नागपूर : शेअर ट्रेडिंग (Share Trading) आणि रिअल इस्टेटमध्ये मल्टिलेव्हल मार्केटिंगचा (Multilevel marketing) फंडा सांगून देशभरातील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या विजय गुरनुले (Vijay Gurnule) या ठकबाजाला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुरनुलेसह दहा आरोपींनाही अटक केली आहे. (Vijay Gurnule arrested for misleading investors with multilevel marketing)

गुरनुले याने गुंतवणूकदारांकडून लुबाडलेले लाखो रुपये अमरावती येथील नातेवाईक महिलेच्या घरात खड्डा खणून त्यात लपवून ठेवले होते. पोलिसांनी तीन खड्ड्यांमधून तब्बल 56 लाख रुपये जप्त केले आहेत. मेट्रो व्हिजन बिल्डकोन कंपनीच्या माध्यमातून विजय गुरनुले याने देशभरातील अनेक नागरिकांना गंडा घातला आहे.

विजय गुरनुले आणि देवेंद्र गजभिये हे प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत. या दोघांनी 2015 मध्ये मेट्रो व्हिजन बिल्डकोन या कंपनीची कंपनी स्थापना केली होती. त्यांनतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सचा वापर करत फसवणुकीचे मायाजाल टाकले. या दोघांनी रिझर्व्ह बँक, सेबी आणि सरकारची कोणतीही परवानगी न घेता रिअल ट्रेड, मेट्रो स्वाडन या आणखी दोन कंपन्या स्थापन केल्या.

या दोघांनी साखळी पद्धतीची एक योजना तयार केली. तीन हजार रुपये गुंतवा, तुमचा आयडी बनवा (सदस्यत्व), त्यानंतर तुम्ही या योजनेत तीन नवे सदस्य जोडा, त्यांच्याकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेतले जाणार. तुम्ही तीन नवे सदस्य जोडले की दरमहा 730 रुपयांचा परतावा मिळवा, अशी योजना सुरु करण्यात आली. हे महाठग एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी अशा प्रकारच्या आणखी 7 नव्या योजना बनवून लोकांना त्यात जोडले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करुन घेतली.

विजय गुरनुले आणि देवेंद्र गजभिये या दोन ठगांच्या भुलपाथांना बळी पडून 25 हजार 400 लोकांनी त्यांच्या फेक योजनांमध्ये गुंतवणूक केली असून त्यासाठी 2 लाख 50 हजार आयडी बनवण्यात आले आहेत. यात साधारणतः 100 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा अंदाज आहे. गुरनुले-गजभियेसह त्यांच्या टोळीने सुरुवातीला विदर्भात आपले नेटवर्क उभारले. तिथे अनेकांची फसवणूक केल्यानंतर त्यांनी उर्वरित महाराष्ट्राकडे आणि इतर राज्यांकडे मोर्चा वळवला. देशभरात त्यांनी नेवर्क उभारले असून आतापर्यंत त्यांनी हजारो लोकांची फसवणूक केली आहे.

काय होती रियल ट्रेंड योजना

– गुंतवणूकदाराने ठराविक रक्कम गुंतविल्यास त्याला निश्चित रकमेचा परतावा दर आठवड्याला मिळेल.

– दर आठवड्याला परतवा मिळत असल्याने गुंतवलेली रक्कम ३ ते ४ महिन्यात दुप्पट होईल.

– रियल ट्रेंड योजनेत 7 उपप्रकार होते.

– 9 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 750 परतावा

– या शिवाय मल्टीलेव्हल मार्केटिंग प्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने आणखी गुंतवणूकदार आणले तर त्याला कमिशन मिळणार होतं.

कमी मुदतीत भरमसाठ परतावा येणार असल्याची हमी असल्याने लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्या लोकांनी या योजनेत अधिकाधिक रक्कम गुंतवली. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी झूम मीटिंग घेऊन लोकांना लॉकडाऊन संपता संपताच तुम्ही श्रीमंत व्हाल असे स्वप्न दाखविले. जास्त गुंतवणूकदार आणणाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. पाहता पाहता कंपनीला 13 हजार प्राथमिक आणि त्यांच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक गुंतवणूकदार मिळाले. आतापर्यंत पोलिसांच्या तपासात 1 लाख 27 हजार गुंतवणूकदार असल्याचे निष्पन्न झाले असून हा घोटाळा तब्बल 70 कोटींच्यावर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा सगळा प्रकार उघड करणाऱ्या पोलिसांचं गृहमंत्र्यांनी अभिनंदन सुद्धा केलं आहे.

इतर बातम्या

नागपुरात बेरोजगारांची दुप्पट रकमेचं आमिष दाखवून फसवणूक, 70 कोटींचा घोटाळा?; आठ जणांना अटक

ड्रग्ज पेडलर्सचं डेअरिंग वाढलं, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंसह NCB च्या पथकावर हल्ला

नशेबाजीसाठी नवनवीन क्लुप्त्या; शितपेयामध्ये औषध टाकून नशा

(Vijay Gurnule arrested for misleading investors with multilevel marketing)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.