निवळीतील विलास सहकारी कारखान्याची फसवणूक, देशमुखसह अन्य दोघांना अटक

जिल्ह्यातील राजकारणात आणि सहकार क्षेत्रात देशमुख कुटूंबियांचे मोठे प्रस्थ आहे. सबंध जिल्ह्यात साखर कारखान्याचे जाळे असून लातुर तालुक्यातील निवळीच्या कारखान्यात तसेच सिद्धी शुगर्समध्ये खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कोट्यावधींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अहमदनगर येथून यापूर्वीच एकास अटक करण्यात आली होती तर मंगळवारी मुरुड पोलीसांनी अणखीन दोघांना ताब्यात घेतले आहे.

निवळीतील विलास सहकारी कारखान्याची फसवणूक, देशमुखसह अन्य दोघांना अटक
संग्रहीत छायाचित्र

लातुर : जिल्ह्यातील राजकारणात आणि सहकार क्षेत्रात देशमुख कुटूंबियांचे मोठे प्रस्थ आहे. सबंध जिल्ह्यात साखर कारखान्याचे जाळे असून लातुर तालुक्यातील निवळीच्या कारखान्यात तसेच सिद्धी शुगर्समध्ये खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कोट्यावधींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अहमदनगर येथून यापूर्वीच एकास अटक करण्यात आली होती तर मंगळवारी मुरुड पोलीसांनी अणखीन दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे कारखान्याच्या फसवणुकीत आणखीन किती जणांचा समावेश हे पाहावे लागणार आहे. (Vilas co-operative factory latur cheated, Deshmukh and two others arrested)
लातुर जिल्ह्यातल्या विलास सहकारी साखर कारखाना आणि सिद्धी शुगर या दोन कारखान्यांना साखर निर्यातीमध्ये कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या चेन्नईच्या कुरिनजी प्रोन्याचरल कंपनीच्या दोन संचालकांना मुरुड पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीपराज चंद्राबाबू आणि मानिकांत एडिगा असं अटक केलेल्या कंपनीच्या संचालकांची नावे आहेत. या कंपनीचा अहमदनगर येथील प्रतिनिधी अभिजित देशमुख याला पोलिसांनी या अगोदरच अटक केली होती. निवळीतील विलास सहकारी साखर कारखाना आणि सिद्धी शुगर कारखान्याचा चेन्नईच्या कुरिनजी प्रोन्याचरल कंपनीशी निर्यातीचा करार झाला होता. मात्र, साखर निर्यात न करता थेट खुल्या बाजारात विक्री करून विलास सहकारी कारखान्याची 8 कोटींची तर सिद्धी शुरर्सची १ कोटीची फसवणूक केल्याचा आरोप कुरिनजी या कंपनीवर आहे. त्याअनुशंगाने मुरुड पोलीसांनी तपास केला असता अहमदनगर येथील कंपनीचा प्रतिनीधी अभिजित देशमुख याला पोलीसांनी यापुर्वीच ताब्यात घेतले होते तर इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. (Vilas co-operative factory latur cheated, Deshmukh and two others arrested)

काय आहे प्रकरण ?

साखर कारखान्यांना एकूण उत्पादनाच्या काही साखर निर्यात करणे बंधनकारक असते. त्याअनुशंगाने विलास सहकारी साखर कारखाना आणि सिद्धी शुगरचे कंत्राट हे चेन्नईतील कुरिनजी प्रोन्याचरल कंपनीला देण्यात आले होते. परंतु, या साखरेची निर्यात न करता थेट खुल्या बाजारात विक्री करण्यात आली होती. यातून विलास साखर कारखान्याचे 8 कोटी आणि सिद्धी चे 1 कोटी रुपयांचे किमान नुकसान झाले आहे

सबसिडी न मिळाल्याने प्रकरण उघडकीस

साखर कारखान्यांनी साखर निर्यात केल्यास केंद्र सरकारकडून सबसिडी देण्यात येते परंतु, साखर निर्यातच न केल्याने सबसिडी ही मिळालीच नाही. यामुळे प्रकरण समोर आले आहे. विलास साखर कर न झाल्याने विलास साखर कारखान्याचे 8 कोटी आणि सिद्धी चे 1 कोटी रुपयांचे किमान नुकसान झाले आहे.

नियमांची अमंलबजावणी न करता खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दोन कारखान्यांची फसवणूक केली आहे. आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची कसून चौकशी सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या : 

औरंगाबादेत पावसाचा हाहा:कार, पिकं पाण्याखाली, मदतीसाठी प्रयत्न करणार, मंत्री भुमरे यांचे आश्वासन

सोयगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकुळ, दहा दिवसात नऊ जनावरांवर हल्ला, मजूरांमध्ये दहशत, शेताकडे फिरकेनात

ऊसतोडणीला नकार दिला म्हणून मजूर महिलेचं अपहरण, मुकादमाविरोधात गुन्हा

(Vilas co-operative factory latur cheated, Deshmukh and two others arrested)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI