नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या गुंडांची भरवस्तीत वरात, वाकड पोलिसांची दबंग कारवाई

जेव्हा पिंपरी चिंचवड मधील वाकड पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांची वरात काढली तेव्हा वाकडच्या नागरिकांना रील नाही तर रीअल मुळशी पॅटर्न अनुभवायला मिळाला.

नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या गुंडांची भरवस्तीत वरात, वाकड पोलिसांची दबंग कारवाई
Follow us
| Updated on: Dec 25, 2019 | 10:26 PM

पिंपरी-चिंचवड : सध्या राज्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर आधारित ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) या सिनेमामध्ये पोलीस सामान्य नागरिकांच्या मनातील गुंडांची दहशत कमी करण्यासाठी गुंडांची भर रस्त्यावरून वरात काढतात. मात्र, जेव्हा पिंपरी चिंचवड मधील वाकड पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांची वरात काढली तेव्हा वाकडच्या नागरिकांना रील नाही तर रीअल मुळशी पॅटर्न अनुभवायला मिळाला (Wakad Police Action).

वाकड पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांची वाकड परिसरातील काळा खडक भागात अक्षरश: वरात काढली. या चारही सराईत गुन्हेगारांवर वाकड परिसरामध्ये दहशत पसरवणे, मारहाण करणे, अपहरण करून खंडणी वसूल करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलिसांनी या प्रकरणी अरविंद साठे, सुरज पवार, राहुल उर्फ बुग्या लष्करे, विशाल कसबे या गुन्हेगारांना अटक केली. त्यानंतर त्यांची भरवस्तीत वरात काढली.

सर्वात धक्कादायक म्हणजे या चार आरोपींमधील आरोपी विशाल कसबे याला वाकड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. मात्र, तरीदेखील तो वाकडमध्ये येऊन त्याच्या साथीदारांच्या मदतीने नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता.

दोन दिवसांपूर्वी मल्हारी लोंढे हा तरुण त्याच्या घरासमोर उभा असताना दहा ते बाराजण तेथे आले. त्यांनी मल्हारी यांना दमदाटी करुन काळा खडक येथील पाण्याच्या टाकीजवळ नेले. तेथे असलेल्या आरोपी शाहरूख खान याने मल्हारी लोंढे याच्या कानशिलात लगावली. ‘तू काय लय मोठा झाला काय, मी भेटायला बोलावूनही तू येत नाही. तुझ्यासाठी थांबायला आम्ही काय वेडे आहोत काय, तू आम्हाला जागा भाड्याने न देता, दुसऱ्याला देतो, तुझी मस्तीच जिरवतो’, असे म्हणून शाहरुख खान याने मल्हारी लोंढेला शिवीगाळही केली. तसेच, त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी बाळू भोसले, शाहरुख खान, अरविंद साठे, आकाश, राहुल पवार, सुरज पवार, बुग्या लष्करे, सोमा लोखंडे तसेच इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील चौघांना ताब्यात घेणयात वाकड पोलिसांना यश आलं. या चौघांना अटक करून पोलिसांनी त्यांची वरात काढली.

काही दिवसांपूर्वी हैद्राबाद पोलिसांनी डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपींचे एन्काऊंटर केले होते. त्यावेळेस नागरिकांनी पोलिसांच्या पाठीशी उभे राहून त्यांची प्रशंसा केली होती. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या आरोपींची वरात काढली. ही वरात पाहण्यासाठी वाकड मधील काळा खडक परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाची वाकड परिसरातील नागरिकांनी प्रशंसा केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

Wakad police action on four criminals

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.