पार्कात संध्याकाळच्या वेळी लोक फिरायला आले, अचानक ग्रीलवर लटकलेला मृतदेह, मृतक निघाला भाजपचा माजी उपाध्यक्ष

पश्चिम दिल्लीचे भाजपचे माजी उपाध्यक्ष जी. एस. बावा यांनी होळीच्या दिवशी आपल्या घराजवळ असलेल्या पार्कात ग्रीलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (West Delhi BJP leader G S Bawa committed suicide in park).

पार्कात संध्याकाळच्या वेळी लोक फिरायला आले, अचानक ग्रीलवर लटकलेला मृतदेह, मृतक निघाला भाजपचा माजी उपाध्यक्ष
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 4:14 PM

नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीत सुभाष नगर येथील एका पार्कात होळीच्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे शांत वातावरण होतं. संध्याकाळ असल्याने आजूबाजूचे लोक पार्कात बसण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी किंवा फिरण्यासाठी आले. मात्र, काही लोक पार्कात आल्यानंतर त्यांना तेथील ग्रीलवर एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांना घाम फुटला. तो मृतदेह नेमका कुणाचा आहे याबाबत चौकशी सुरु झाली. मात्र, कुणीही ओळखू शकत नव्हतं. अखेर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा संबंधित मृतक हे पश्चिम दिल्लीचे भाजपचे माजी उपाध्यक्ष जी. एस. बावा असल्याचं समोर आलं (West Delhi BJP leader G S Bawa committed suicide in park).

नेमकं प्रकरण काय?

पश्चिम दिल्लीचे भाजपचे माजी उपाध्यक्ष जी. एस. बावा यांनी होळीच्या दिवशी आपल्या घराजवळ असलेल्या पार्कात ग्रीलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बावा यांच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय होतं, याचा शोध पोलीस घेत आहेत. बावा यांच्या घरात आणि त्यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील गूढ आणखी वाढलं आहे. दरम्यान, बावा यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या पक्षातील नेतेमंडळी आणि पोलीस काहीच स्पष्टपणे सांगताना दिसत नाहीत.

पोलिसांचा तपास सुरु

जी. एस. बावा हे 58 वर्षांचे होते. ते पश्चिम दिल्लीतील फतेह नगर येथे वास्तव्यास होते. त्यांनी होळीच्या दिवशी घराजवळ असणाऱ्या पार्कात आत्महत्या केली. पण त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. काही लोकांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलीस या आत्महत्ये प्रकरणी चौकशी करत आहेत. याप्रकरणाची तपास केल्यानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे (West Delhi BJP leader G S Bawa committed suicide in park).

हेही वाचा : Chehre Update | अमिताभ-इमरानच्या ‘चेहरे’ला कोरोना पुन्हा फटका! चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.