हरयाणात 45 वर्षीय महिलेचा बलात्कार करुन गळा आवळला, पतीचा सावत्र मुलावर आरोप

का 45 वर्षीय मलिलेवर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:58 PM, 21 Nov 2020
हरयाणात 45 वर्षीय महिलेचा बलात्कार करुन गळा आवळला, पतीचा सावत्र मुलावर आरोप
Wife stabbed to death in Palghar

फरीदाबाद : हरयाणाच्या गुरुग्राममध्ये एक अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे (Woman Found Raped And Murder). येथे एका 45 वर्षीय मलिलेवर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. हरयाणातील पतौडीच्या हेली मंडी येथे ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात महिलेच्या मोठ्या मुलाचा शोध पोलीस घेत आहेत. कारण, या महिलेच्या पतीने सावत्र मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे (Woman Found Raped And Murder).

पोलिसांनी सुरुवातीला आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतर महिलेच्या पतीने पोलिसांत सावत्र मुलाविरोधात तक्रार दाखल केली. या, सावत्र मुलाने आधी महिलेवर बलात्कार केला त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली, अशी तक्रार पतीने केली आहे. त्यानंतर महिलेचं शवविच्छेदन करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 306 आणि 376 अंतर्गत गुन्हा दाोखल करण्यात आला आहे.

1995 मध्ये पहिलं लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचं 1995 मध्ये लग्न झालं होतं. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 1998 मध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने तिच्या दिराशी लग्न केलं (Woman Found Raped And Murder).

महिलेच्या दुसऱ्या पतीने दावा केला आहे की त्यांच्या सावत्र मुलाला दारु आणि ड्रग्जचं व्यसन आहे. त्याचं नेहमी घरच्यांशी भांडण होत राहायचं. मुलाने महिलेच्या पतीला काही दिवसांपूर्वी घराबाहेर काढलं.

संशयित सावत्र मुलगा फरार

पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. मात्र, अज्ञाप पोलिसांनी कुणालाही ताब्यात घेतलेलं नाही. महिलेच्या मोठ्या मुलाचा शोध पोलीस घेत आहेत.

Woman Found Raped And Murder

संबंधित बातम्या :

वसई पुन्हा हादरली, पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू, पत्नीचा बेडवर तर पतीचा मृतदेह छतावर आढळला

दिल्लीत प्रियकराची हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन गुजरातमध्ये फेकले, आई, होणारा नवरा आणि प्रेयसी अटकेत