चॅनल बदललं नाही म्हणून मुलाची गळा आवळून हत्या

चंदीगड : टीव्हीवरील चॅनल बदललं नाही म्हणून एका 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मेवात येथील 14 वर्षीय राहुल खान हा त्याच्या वडील अमृत खान यांच्यासोबत गुरुग्राममध्ये राहायचा. अमृत खान हे पतौडी रोडवर असलेल्या एका आरा मशीनवर काम करतात. राहुल हा त्याच्या वडिलांसोबत त्या आरा मशीनजवळील एका खोलीत …

चॅनल बदललं नाही म्हणून मुलाची गळा आवळून हत्या

चंदीगड : टीव्हीवरील चॅनल बदललं नाही म्हणून एका 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मेवात येथील 14 वर्षीय राहुल खान हा त्याच्या वडील अमृत खान यांच्यासोबत गुरुग्राममध्ये राहायचा. अमृत खान हे पतौडी रोडवर असलेल्या एका आरा मशीनवर काम करतात.

राहुल हा त्याच्या वडिलांसोबत त्या आरा मशीनजवळील एका खोलीत राहायचा. तो त्या खोलीत टीव्ही बघत बसला होता. तेव्हा तिथे काम करणारा उदय मंडल आला. उदयने राहुलला टीव्हीवरील चॅनेल बदलण्यास सांगितले. पण, राहुलने चॅनल बदलण्यास नकार दिला. यावरुन राहुल आणि उदयमध्ये बाचाबाची झाली. तेव्हा तिथे काम करणाऱ्या इतर कामगारांनी या दोघांमधील वाद मिटवला.

मात्र, उदय मंडलचा राग शांत झालेला नव्हता. राहुलने त्याचं ऐकलं नाही, चॅनल बदललं नाही, याचा राग मनात धरुन उदयने टोकाचे पाऊल उचललं. रात्री राहुल झोपलेला असताना उदय त्याच्या जवळ गेला आणि झोपेतच त्याचा गळा आवळला. यामध्ये राहुलचा मृत्यू झाला. याबाबत राहुलच्या घरच्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी उदयला अटक केली. जिल्हा न्यायालयाने सध्या उदयला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

VIDEO : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *