1993 मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी अब्दुल गनीचा नागपुरात मृत्यू

नागपूर : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटतील आरोपी अब्दुल गनी तुर्क याचा बुधवारी नागपूरच्या जीएमसी रुग्णालयात मृत्यू झाला. अब्दुल गनी हा नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत होता. गेल्या काही दिवसांपासून अब्दुल गनी आजारी होता. त्याच्यावर जीएमसी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतचे पत्र नागपूर मध्यवर्ती कारागृहाकडून धंतोली पोलिसांना पाठवण्यात आलं …

993 Serial Bomb Blast, 1993 मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी अब्दुल गनीचा नागपुरात मृत्यू" width="600" height="395">

नागपूर : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटतील आरोपी अब्दुल गनी तुर्क याचा बुधवारी नागपूरच्या जीएमसी रुग्णालयात मृत्यू झाला. अब्दुल गनी हा नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत होता. गेल्या काही दिवसांपासून अब्दुल गनी आजारी होता. त्याच्यावर जीएमसी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतचे पत्र नागपूर मध्यवर्ती कारागृहाकडून धंतोली पोलिसांना पाठवण्यात आलं आहे.

मुंबईत 1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात अब्दुल गनीने सेंचुरी बाजारात बॉम्ब ठेवला होता. या बॉम्ब स्फोटात 113 लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अब्दुल गनीला टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेचे रुपांतर करत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अब्दुल गनी हा एक टॅक्सी ड्रायव्हर होता. त्याच्यावर मुंबईच्या सेंचुरी बाजारात मॅनहोल खाली आरडीएक्स लावल्याचा आरोप होता. या मॅनहोलवरुन एक बस जात असताना मोठा स्फोट झाला. यामध्ये 113 जणांचा मृत्यू झाला, तर 227 जण जखमी झाले होते.

मुंबईत 12 मार्च 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटाने संपूर्ण देशाला हादरा बसला होता. हा स्फोट घडवून आणण्यात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, याकूब मेनन आणि त्याचा भाऊ टायगर मेननचा हात होता. मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवणाऱ्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम आणि टायगर मेनन अद्यापही फरार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *