लग्नमंडपात नवरदेवाची आत्महत्या, मुहूर्ताच्या तोंडावर गळफास

लग्नाच्या काही तासांपूर्वीच नवरदेवाने लग्नमंडपात आत्महत्या (groom suicide in wedding in haidrabad) केली आहे. विशेष म्हणजे मुहूर्ताच्या तोंडावरती गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लग्नमंडपात नवरदेवाची आत्महत्या, मुहूर्ताच्या तोंडावर गळफास

हैद्राबाद : लग्नाच्या काही तासांपूर्वीच नवरदेवाने लग्नमंडपात आत्महत्या (groom suicide in wedding haidrabad) केली आहे. विशेष म्हणजे मुहूर्ताच्या तोंडावरती गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना हैदराबादमधील कोमपल्ली (groom suicide in wedding haidrabad) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास हैद्राबाद पोलीस करत आहेत. एन. एस. संदीप असं या मृत मुलाचे नाव आहे.

लग्न समारंभादरम्यान, बराच वेळ नवरदेव बाहेर न आल्यामुळे नातेवाईक मेकअप रुमजवळ गेले. मेकअप रुपमध्ये नवरा एकटाच होता. या रुम बाहेर उभे राहून नातेवाईकांनी बराचवेळ बाहेरुन आवाज दिला. पण आतून काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर मुलाचा मृतदेह पंख्याला लटकलेला पाहून सर्वांना एकच धक्का बसला. मुलाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना ही घटना ऐकून धक्का बसला. मुलाने लग्नाच्या काही मिनिटांपूर्वीच आत्महत्या का केली, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेह शवविच्छेद करण्यासाठी एका खासगी रुग्णालयात पाठवला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *