बालमजुरी विरोधात 7 वर्षात तब्बल 2620 गुन्हे, 1039 मुलांची सुटका

मुंबई पोलिसांकडून 2013 ते मे 2019 या कालावधीत बालमजूर ठेवणाऱ्या लोकांविरोधात 2620 गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या 7 वर्षाच्या कालावधीतील हा आकडा पाहून आपल्या देशात अजूनही बालमजुरीच्या प्रमाणात घट झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

बालमजुरी विरोधात 7 वर्षात तब्बल 2620 गुन्हे, 1039 मुलांची सुटका

मुंबई : मुंबई पोलिसांकडून 2013 ते मे 2019 या कालावधीत बालमजूर ठेवणाऱ्या लोकांविरोधात 2620 गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या 7 वर्षाच्या कालावधीतील हा आकडा पाहून आपल्या देशात अजूनही बालमजुरीच्या प्रमाणात घट झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. ही माहिती माहिती अधिकार कायद्यान्वे (RTI) समोर आली आहे.

देशात बालमजुरी करणे गुन्हा आहे. पण तरीही काही ठिकाणी लोक बालमजूर ठेवत लहान मुलांचे भविष्य उद्धवस्त करतात. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बालमजूर ठेवणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत 1039 मुलांची सुटका केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली.

2013 मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण 174 खटले दाखल झाले त्यातील 72 मुलांची सुटका करण्यात आली होती. तर 2014 मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण 441 खटले दाखल झाले होते यात 124 मुलांची सुटका केली होती. विशेष म्हणजे 2015 मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात वाढ होऊन 718 खटले दाखल करण्यात आले त्यातील 457 मुलांची सुटका करण्यात आली होती.

2016 मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात 535 खटले दाखल करण्यात आले त्यातील 165 मुलांची सुटका केली होती. 2017 मध्येही बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण 486 खटले दाखल झाले होते. यामध्ये 138 मुलांची सुटका केली होती. तर 2018 मध्ये एकूण 223 खटले दाखल झाले होते आणि 31 मुलांना सोडवण्यात आले. तर यंदा मे 2019 पर्यंत बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण 43 खटले दाखल झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत 34 मुलांना सोडविण्यात पोलिसांना यश आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *