वाढदिवसाच्या दिवशीच धारधार शस्त्राने वार करत मित्राकडून मित्राची हत्या

घाटकोपरमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (28 जुलै) मध्य रात्री साईबाबा गार्डन येथे घडली.

वाढदिवसाच्या दिवशीच धारधार शस्त्राने वार करत मित्राकडून मित्राची हत्या
Follow us
| Updated on: Jul 29, 2019 | 12:42 PM

मुंबई : घाटकोपरमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (28 जुलै) मध्य रात्री साईबाबा गार्डन येथे घडली. नितेश सावंत (32) असं मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पंतनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे.

घाटकोपरमधील नितेश सावंत याचा शनिवारी (27 जुलै) वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्रांनी त्याला रविवारी रात्री उशिरा साईबाबा गार्डन येथे बोलवले. या दरम्यान त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनीची त्याच्यावर सपासप वार करत तेथून पळ काढला.

यानंतर घटनास्थळी पंतनगर पोलीस दाखल झाले आणि नितेशला जखमी अवस्थेत नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

एका आठवड्यापूर्वी नितेश आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाले होते. याच वादातून हा खून झाल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून अधिक तपास करत आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.