नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं 30 लाखांचं कफ सिरप जप्त

मुंबई : नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं तब्बल 30 लाख रुपयांचं कफ सिरप मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलं. मरिन लाईन्स येथील बडा कब्रिस्तान परिसरातून पोलिसांनी कफ सिरपच्या बाटल्यांनी भरलेला टेम्पो ताब्यात घेतला.  या टेम्पोमध्ये एकूण 30 लाख रुपयांचं नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं कफ सिरप होतं. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या …

नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं 30 लाखांचं कफ सिरप जप्त

मुंबई : नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं तब्बल 30 लाख रुपयांचं कफ सिरप मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलं. मरिन लाईन्स येथील बडा कब्रिस्तान परिसरातून पोलिसांनी कफ सिरपच्या बाटल्यांनी भरलेला टेम्पो ताब्यात घेतला.  या टेम्पोमध्ये एकूण 30 लाख रुपयांचं नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं कफ सिरप होतं. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुजरातहून मोठ्या प्रमाणात ‘कोडेन फॉस्फेट’ या सिरपचा साठा मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. हे कफ सिरप नशा करण्यासाठी वापरलं जातं. या माहितीच्या आधारे पथकाच्या अधिकाऱ्यांनी तपास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटने मरिन लाइन्स येथील बडा कब्रिस्थान येथून या कफ सिरपने भरलेला एक टेम्पो ताब्यात घेतला. या प्रकरणी वीरेंद्र सिंग, अझहर जमाल सय्यद, यशपाल गोपाल सिंग, सर्वर मोहम्मद शेख या चौघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी दोघे हा टेम्पो गुजरातहून घेऊन आले होते. तर इतर दोघे या कफ सिरपची खरेदी करण्यासाठी आले होते.

पोलिसांनी हा टेम्पो तसेच टेम्पोमध्ये लपवण्यात आलेल्या 5,760 कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेले हे आरोपी कपड्यात लपवून बाटल्यांची तस्करी करत असल्याचं कारवाईत समोर आलं आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *