गेल्या 6 वर्षात मुंबईत 536 कोटी रुपयांच्या वाहनांची चोरी!

मुंबई : मुंबईत सर्वात जास्त वाहने वापरली जातात. गेल्या सहा वर्षात मुंबईत 536 कोटी 65 लाख 77 हजार 159 रुपये वाहनांची चोरी झाली आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहितीच्या अधिकाराखाली समोर आणली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी  मुंबई पोलीस विभागाकडे  2013 पासून 2018  पर्यंत मुंबईत किती वाहनांची चोरी झाली …

गेल्या 6 वर्षात मुंबईत 536 कोटी रुपयांच्या वाहनांची चोरी!

मुंबई : मुंबईत सर्वात जास्त वाहने वापरली जातात. गेल्या सहा वर्षात मुंबईत 536 कोटी 65 लाख 77 हजार 159 रुपये वाहनांची चोरी झाली आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहितीच्या अधिकाराखाली समोर आणली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी  मुंबई पोलीस विभागाकडे  2013 पासून 2018  पर्यंत मुंबईत किती वाहनांची चोरी झाली आहे, चोरी झालेल्या वाहनांमध्ये किती वाहनं सापडली आहेत, एकूण किती किंमतीची वाहने हस्तगत झाली आहेत. याबाबत माहिती विचारली होती.

माहितीप्रमाणे  मुंबईत जानेवरी 2013 पासून  डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 19,907 वाहन चोरीचे गुन्हे नोंद झाले आहेत. यामध्ये एकूण 536 कोटी 65 लाख 77 हजार 159 रुपये किंमतीची वाहनं चोरी झाली आहे. यामधील आतापर्यंत पोलिसांना फक्त 5,462 गुन्ह्यांची उघड झाली आहे. पोलिसांना हस्तगत झालेल्या वाहनांची एकूण किंमत 74 कोटी 60 लाख 9 हजार 321 रुपये आहे. म्हणजे फक्त 27 टक्के चोरी झालेले वाहने हस्तगत केली आहेत.

वर्षाप्रमाणे मुंबईत गुन्ह्यांची नोंद

वर्ष 2013

एकूण चोरी झालेली वाहने – 3,789, एकूण किंमत (62 कोटी 13 लाख 43 हजार 556 रुपये)

परत मिळाली वाहने – 859, एकूण किंमत (14 कोटी 47 लाख 14 हजार 612 रुपये)

वर्ष 2014

एकूण चोरी झालेली वाहने – 3,474, एकूण किंमत (52 कोटी 26 लाख 7 हजार 84 रुपये)

परत मिळाली वाहने – 906, एकूण किंमत (14 कोटी 44 लाख 98 हजार 452 रुपये)

 वर्ष 2015

एकूण चोरी झालेली वाहने – 3,311, एकूण किंमत (40 कोटी 45 लाख 71 हजार 864 रुपये)

परत मिळाली वाहने – 840, एकूण किंमत (11 कोटी 07 लाख 67 हजार 314 रुपये)

वर्ष 2016

एकूण चोरी झालेली वाहने – 3,118, एकूण किंमत (38 कोटी 40 लाख 75 हजार 485 रुपये)

परत मिळाली वाहने – 861, एकूण किंमत (11 कोटी 01 लाख 23 हजार 316 रुपये)

वर्ष 2017

एकूण चोरी झालेली वाहने – 3,012, एकूण किंमत (29 कोटी 86 लाख 13 हजार 601 रुपये)

परत मिळाली वाहने – 935, एकूण किंमत (10 कोटी 49 लाख 49 हजार 427 रुपये)

वर्ष 2018

एकूण चोरी झालेली वाहने – 3,203, एकूण किंमत (31 कोटी 53 लाख 65 हजार 569 रुपये)

परत मिळाली वाहने – 1,331, एकूण किंमत (13 कोटी 09 लाख 56 हजार 200 रुपये)

“वाहनांच्या चोरीमध्ये आंतरराज्य वाहन चोरांच्या टोळीचा सहभाग असून मोठ्या प्रमाणात चोरी झालेली वाहने नेपाळमध्ये विकली जातात. तसेच भंगारमध्ये सुद्धा विकली जातात. यावर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. यावर आळा बसण्यासाठी 24 तास लक्ष ठेवण्यासाठी कर्माचारी सीसीटीवीवर नजर ठेवण्यासाठी नियुक्त करावे”, असं माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *