माथेफिरुचा 7 जणांवर कोयत्याने हल्ला, मानेवर, डोक्यात वार, जखमींमध्ये 5 वर्षांचा चिमुकला

माथेफिरु तरुणाने तब्बल सात जणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा (Lanja, Ratnagiri crime)  इथं ही थरारक घटना घडली.

Lanja Ratnagiri crime, माथेफिरुचा 7 जणांवर कोयत्याने हल्ला, मानेवर, डोक्यात वार, जखमींमध्ये 5 वर्षांचा चिमुकला

रत्नागिरी : माथेफिरु तरुणाने तब्बल सात जणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा (Lanja, Ratnagiri crime)  इथं ही थरारक घटना घडली. धक्कादायक म्हणजे या माथेफिरुने (Lanja, Ratnagiri crime) सर्वांच्या मानेवर, हातावर आणि डोक्यावर हल्ला केला. जखमींमध्ये एका पाच वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे.

लांजा तालुक्यातील देवधे इथे आज हा सर्व थरार झाला. माथेफिरुने कोयत्याने 7 जणांवर हल्ला करुन त्यांना जबर जखमी केलं.   मानेवर, हातावर, डोक्यावर वार केल्याने हे सर्वजण रक्तबंबाळ झाले आहेत.

ही घटना घडल्यानंतर हा तरुण स्वतः पोलीस स्थानकात झाला दाखल. या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.  हल्ल्यातील जखमींना पुढील उपचारासाठी रत्नागिरीत हलवण्यात आलं आहे.

दिवसाढवळ्या अशाप्रकारचा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *