नवी मुंबईत अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण

नवी मुंबई : नवी मुंबईमधील उलवे भागात रहाणाऱ्या हसीना अब्दुल हमिद शेख या महिलेच्या अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना एनआरआय सागरी पोलिसांनी अवघ्या चार तासाच्या आत पकडून बालकाची सुटका करत महत्त्वाची कामगिरी केली. सरोज जिनत राव आणि जिन्नत बचरसिंग राव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आर्थिक देवाणघेवाणीतून शेख यांच्या बालकाचे अपहरण केल्याचे …

नवी मुंबईत अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण

नवी मुंबई : नवी मुंबईमधील उलवे भागात रहाणाऱ्या हसीना अब्दुल हमिद शेख या महिलेच्या अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना एनआरआय सागरी पोलिसांनी अवघ्या चार तासाच्या आत पकडून बालकाची सुटका करत महत्त्वाची कामगिरी केली. सरोज जिनत राव आणि जिन्नत बचरसिंग राव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आर्थिक देवाणघेवाणीतून शेख यांच्या बालकाचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त डॉ.सुधाकर पठारे यांनी दिली.

या प्रकरणातील तक्रारदार हसीना शेख आणि आरोपी राव दाम्पत्य हे एकमेकांच्या चांगल्या ओळखीतले आहेत. हसीना शेखचा पती अब्दुल हमिद शेख याच्याकडे दोन गाड्या असल्याने त्यातील एक कार त्याने आरोपी जिन्नत राव याला 65 हजार रुपयांना विकली होती. तसेच सदर कारवरील कर्ज जिन्नत राव याच्यावर ट्रान्स्फर केले होते. या व्यवहारातील काही रक्कमेची देवाण घेवाण बाकी असतानाच शनिवारी सांयकाळी आरोपी सरोज रावगी पतीसह हसीना शेख हिच्या उलवे येथील घरी गेली होती. यावेळी तीने हसीना शेख हिच्या अडीच वर्षाच्या मुलाला आईसक्रीम  घेऊन देण्याच्या बहाण्याने आपल्यासोबत नेले. त्यानंतर तीने आणि तीच्या पतीने हसीनाच्या मुलाचे अपहरण करुन पलायन केले. हा प्रकार हसीनाच्या लक्षात आल्यानंतर तीने तात्काळ एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एनआरआय पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी तात्काळ विविध पथके रवाना केली.

दरम्यान, आरोपी हे राजस्थान येथील जालोर येथील आहेत. तसेच त्यांच्याकडे हुंडाई ऍक्सेंट कार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे दाम्पत्य आपल्या कारने राजस्थान येथे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी नवी मुंबई ते राजस्थान दरम्यान, महामार्गावर असलेल्या सर्व टोल नाक्यांशी संपर्क साधून त्यांना आरोपींच्या वाहनाची माहिती आणि वाहनाचा नंबर दिला. तसेच एका पथकाला महामार्गावरील विशेष अभियान ग्रुपच्या (एसओजी) पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी देऊन दुसऱ्या पथकाला गुजरात येथे रवाना केले. यादरम्यान, आरोपी राव दाम्पत्य हे मुलासह वापी, वलसाड, सुरत भरुच मार्गे राजस्थान येथे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक भुषण कापडणीस आणि योगेश परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखा व एसओजीच्या पथकाशी समन्वय साधून त्यांच्याशी सतत संपर्क ठेवला. त्यामुळे रात्री 10 च्या सुमारास भरुच स्थानिक गुन्हे शाखा व एसओजीच्या पथकाने राव दाम्पत्याला भरुच टोल नाक्यावर पकडले. त्यानंतर पोलिसांनी राव दाम्पत्याची चौकशी केली असता, अब्दुल हमिद शेख यांच्यासोबत वाहनाच्या खरेदी विक्रीच्या आर्थिक देवाण घेवाणीतून त्यांनी अब्दुल शेख यांच्या मुलाचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस उपआयुक्त डॉ.सुधाकर पठारे यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *