पॅरोलवर बाहेर असलेल्या आरोपीकडून असंख्य दरोडे, पाच वर्षांनंतर फारार आरोपीला पकडण्यात यश

नाशकात पॅरोलवर असलेल्या आरोपीने दरोड्याचे अनेक गुन्हे केल्याचं समोर आलं आहे. 10 वर्षाची शिक्षा भोगत असताना आईच्या आजारपणाचे कारण सांगून पॅरोलवर बाहेर या आरोपीने 55 लाखांच्या कॅश व्हॅन लुटीसह असंख्य दरोड्याचे गुन्हे केले

पॅरोलवर बाहेर असलेल्या आरोपीकडून असंख्य दरोडे, पाच वर्षांनंतर फारार आरोपीला पकडण्यात यश
Follow us
| Updated on: Feb 19, 2020 | 8:21 AM

भिवंडी : नाशकात पॅरोलवर असलेल्या आरोपीने दरोड्याचे अनेक गुन्हे केल्याचं समोर आलं आहे. 10 वर्षाची शिक्षा भोगत असताना आईच्या आजारपणाचे कारण सांगून पॅरोलवर बाहेर या आरोपीने 55 लाखांच्या कॅश व्हॅन लुटीसह असंख्य दरोड्याचे गुन्हे केले (Robbery Case Accuse). मोहम्मद शरीफ उर्फ बाबा अब्दूल कादरी (वय 43) असं या अट्टल दरोडेखोराचं नाव आहे. तब्बल पाच वर्षांनंतर या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश आले आहे (Robbery Case Accuse).

मोहम्मद शरीफ मूळचा उत्तरप्रदेश डुंबरीयागंजचा

मोहम्मद शरीफ उर्फ बाबा अब्दूल कादरी याला नंदुरबारमध्ये गोळीबार करुन सोने लुटी प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेसाठी नाशिक कारागृहात त्याची रवानगी केल्यानंतर 30 ऑगस्ट 2014 रोजी आईच्या आजारपणाचे करण देऊन तो तीस दिवसांच्या पॅरोलवर कारागृहाबाहेर आला. त्यानंतर सतत तीन महिने तो पॅरोलची मुदत वाढवून घेत होता. त्यानंतर तो कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी हजर न होता फरार झाला.

भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना गुप्त बातमीदारामार्फत फरार मोहम्मद शरीफ आरोपी कल्याण येथील गुरुदेव हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून अट्टल दरोडेखोर मोहम्मद शरीफ उर्फ बाबा अब्दूल कादरी याच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी त्याच्या ताब्यातून दरोडा घालून चोरी केलेल्या रोख रकमे पैकी 1 लाख 96 हजार रुपयाच्या तत्कालीन जुन्या 500 रुपयाच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या.

खळबळजनक बाब म्हणजे आरोपीने जेलमधून पॅरोल रजेवरुन फरार झाल्यानंतर औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल-निळजे या शहरात आपल्या साथीदारांसह दरोडे टाकून लाखो रुपयांची लूट केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. आरोपी आपल्या साथीदारांच्या मदतीने पनवेल नजीक निळजे रेल्वे स्टेशन जवळ आपल्या साथीदारांच्या मदतीने बँकेत जमा करण्यासाठी जात असलेलं कॅश वाहन रस्त्यात अडवून चालकास प्राणघातक शस्त्रांचा धाक दाखवून 55 लाख 29 हजार 67 रुपये आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 55 लाख 34 हजार 567 रुपयांची लूटमार केली होती. तसेच, डोंबिवली मानपाडा येथे 2015 मध्ये कोयत्याच्या धाकाने जबरी दरोडा टाकून 1 लाख 96 हजाराची रोख रक्कम लुटली होती. नवी मुंबई येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीत 2016 मध्ये दरोडा टाकून 18 किलो सोने पळविले होते. 2016 मध्ये त्याने पॅरोलच्या काळात त्याने औरंगाबाद येथील उस्मानपुरा तसेच 2017 मध्ये हैद्राबाद येथील मेलारदेवपल्ली येथील मुथूट फायनान्स कंपनीत सोने लुटण्याचा देखील प्रयत्न केल्याने या गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्यावर विविध गुन्हे दाखल झाले होते.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.