नागपुरात महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला, तिघी जखमी

सावनेर तालुक्यात महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना (Acid attack on female doctor) घडली.

Acid attack on female doctor, नागपुरात महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला, तिघी जखमी

नागपूर : सावनेर तालुक्यात महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना (Acid attack on female doctor) घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात महिला डॉक्टरसह तिघे जखमी झाले आहेत. यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी आरोपीला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. किशोर कान्हेरीया असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव (Acid attack on female doctor) आहे.

या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या आहेत. डॉ. सोफी सायमा, गौरी सोनेकर आणि सुरेखा बंडे अशी जखमींची नावं आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या डॉ. शुभ्रा जोशी, डॉ. सुकन्या कांबळे थोडक्यात बचावल्या आहेत. जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

डॉ सोफी या नागपुरातील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये असिसटंट लेक्चरर आहेत. त्या नॅशनल एड्स कन्ट्रोल ऑर्गनायझेशन या प्रोजेक्टच्या सर्वेक्षणासाठी सावनेर येथे गेल्या होत्या. सर्वेक्षण करीत असताना माथेफिरु आरोपी किशोरने त्यांच्यावर अॅसिड फेकले. त्यात डॉक्टरसह दोघी जखमी झाल्या. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी किशोरला पकडून बदडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *