लैंगिक शोषणाला कंटाळून दत्तक मुलीकडून पित्याची हत्या

माहीम बीचवर 2 डिसेंबर रोजी बेवारस सुटकेसमध्ये सापडलेल्या शरीराच्या तुकड्याचे गुढ आता उकललं आहे. या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे (Mahim beach dead body found in suitcase)  तुकडे आढळले होते.

लैंगिक शोषणाला कंटाळून दत्तक मुलीकडून पित्याची हत्या

मुंबई : माहीम बीचवर 2 डिसेंबर रोजी बेवारस सुटकेसमध्ये सापडलेल्या शरीराच्या तुकड्याचे गुढ आता उकललं आहे. या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे (Mahim beach dead body found in suitcase)  तुकडे आढळले होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पण अवघ्या 5 ते 6 दिवसात माहीम पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे. सुटकेसमधील असलेले शरीराचे तुकडे हे बेनेट रिबेलो यांचे आहेत. त्यांच्या दत्तक मुलीनेच बेनेट यांची हत्या केल्याचे समोर आलं आहे. बेनेट आपल्या दत्तक घेतलेल्या मुलीचे लैंगिक शोषण करत होता. त्यामुळे कंटाळलेल्या मुलीने पित्याची हत्या (Mahim beach dead body found in suitcase) केली, असं तपासात उघड झाले आहे.

आरोपी मुलगी ही पित्याच्या वागणुकीला कंटाळली होती. बेनेट सतत मुलीसोबत गैरवर्तन करत होता. तसेच तिला तिच्या प्रियकरापासूनही लांब ठेवत होता. त्यामुळे मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बेनेट यांची चाकूने आणि काठीने मारुन हत्या केली. तसेच त्यांनी मच्छर मारण्याचे औषध काळे हिटही बेनेट यांना पाजले होते.

आरोपी मुलीने आणि तिच्या प्रियकराने तीन दिवस मृतदेह घरात ठेवला होता. यानंतर दोघांनी चार मोठे चाकू खरेदी केले. हे चाकू गरम करुन त्यांनी बेनेटच्या शरीराचे तुकडे केले. तुकडे सुटकेसमध्ये भरुन त्यांनी मिठी नदीत फेकून दिले. दोघांनी तीन दिवसांत तीन सुटकेसमध्ये शरीराचे तुकडे भरुन ते नदीत फेकले होते, असं पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, सुटकेसमध्ये शरीराच्या तुकड्या शिवाय शर्ट आणि पँटही मिळाली होती. त्या शर्टवर टेलरचे नाव होते. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेत बेनेट यांच्या दत्तक मुलीला अटक केली.

संबंधित बातम्या :

माहीम बीचवर सुटकेसमध्ये मानवी शरीराचे तुकडे

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *