वसईत तीन महिन्यानंतर हत्येचा उलगडा, अनैतिक संबधातून हत्या

वसई : अनैतिक संबंधातून मेहुण्यानेच मेहुण्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. 21 सप्टेंबर 2018 रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावर चिंचोटी हद्दीत हत्या करण्यात आली होती. हत्या करून मृतदेह फेकून आरोपी फरार झाले होते. मात्र चार महिन्याच्या तपासानंतर या हत्येचा उलगडा झाला असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात वालीव पोलिसांना यश आलं आहे. 21 …

वसईत तीन महिन्यानंतर हत्येचा उलगडा, अनैतिक संबधातून हत्या

वसई : अनैतिक संबंधातून मेहुण्यानेच मेहुण्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. 21 सप्टेंबर 2018 रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावर चिंचोटी हद्दीत हत्या करण्यात आली होती. हत्या करून मृतदेह फेकून आरोपी फरार झाले होते. मात्र चार महिन्याच्या तपासानंतर या हत्येचा उलगडा झाला असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात वालीव पोलिसांना यश आलं आहे.

21 सप्टेंबर 2018 रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी परिसरात डोक्यावर प्राणघातक हल्ला करून एकाची हत्या करून आरोपी फरार झाले होते. मृतदेह पोलिसांना मिळाल्यानंतर त्याची कोणतीही ओळख पटली नव्हती. याबाबत अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून, मृतदेहाची ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. याच तपासचक्रात मयत हा एक सराईत घरफोडी गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मयताचं दीपक नेपाळे असं नाव असल्याची ओळख पटली.

या मयत दीपकवर वालीव पोलीस ठाण्यात घरफोडीचे तीन गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले होते. या तपासात मयताच्या हातावर गोंधलेली निशाणी आणि पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड यांच्या आधारावर मयताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. या अनुषंगाने तपास केला असता, ही हत्या मयत दीपकच्या पत्नीच्या सख्या भावानेच आपल्या साथीदाराच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले.

तपासानंतर पोलिसांना आरोपींना अटक केली. प्रताप त्यागी आणि अंकुश यादव अशी त्यांची नावं आहेत. यादोघांनी अनैतिक संबंधातून दीपक नेपाळे याची हत्या केली असल्याची कबुली वालीव पोलिसांना दिली आहे. हे दोन्ही आरोपीही घरफोडीतील सराईत गुन्हेगार आहेत. मयत दीपक हा प्रताप त्यागी या आरोपीचा मेहुणा होता. आरोपी आणि मयत हे तिघेही घरफोडीतील सराईत चोरटे आहेत. त्यांचा आणखी एक साथीदार होता त्याचा अपघातात मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या साथीदाराच्या पत्नीसोबत आरोपीचे अनैतिक संबंध होते आणि याच अनैतिक संबंधातून यांचे वाद झाल्याने ही हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *