प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

अहमदनगर : प्रेयसी व्यवस्थित वागत नाही, म्हणून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली. इतकेच नाही तर प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकराने आत्महत्या करत स्वत:चंही जीवन संपवलं. अहमदनगरच्या श्रीरामपूर परिसरात हा हत्या आणि आत्महत्येचा प्रकार घडला. विशेष म्हणजे हे प्रेमी युगुल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. निता गोर्डे (वय 40) आणि गणेश दळवी (वय 30) यांच्यात प्रेम […]

प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

अहमदनगर : प्रेयसी व्यवस्थित वागत नाही, म्हणून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली. इतकेच नाही तर प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकराने आत्महत्या करत स्वत:चंही जीवन संपवलं. अहमदनगरच्या श्रीरामपूर परिसरात हा हत्या आणि आत्महत्येचा प्रकार घडला. विशेष म्हणजे हे प्रेमी युगुल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

निता गोर्डे (वय 40) आणि गणेश दळवी (वय 30) यांच्यात प्रेम संबंध होते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील वार्डक्रमांक 1 मध्ये अडसुळ गल्ली येथे हे प्रेमी युगुल भाड्याने राहात होते. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. एक महिन्यापूर्वी त्यांनी विवाह केल्याचंही बोललं जात आहे.

शनिवारी या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन गल्लीतच वाद झाला. त्यानंतर ते दोघेही घरात गेले, तेव्हाही त्यांचं भांडण सुरुच होतं. त्यांच्या भांडणाचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. मात्र काही वेळाने त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज येणं अचानक थांबलं. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी घरात डोकावून बघितलं, तेव्हा हे प्रेमी जोडपं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं दिसलं. हे दृष्य बघताचं शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

या प्रेमी युगुलाचे भांडण एवढ्या विकोपाला गेले की, गणेशने नितावर चाकूने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वरही चाकूने वार करत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. निता गणेशसोबत व्यवस्थित वागत नसल्याने त्यांच्यात भांडण झालं आणि त्यातून ही हत्या आणि आत्महत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.