काही गोष्टी सांगता येत नाहीत, सुसाईड नोट लिहून Atlas सायकल कंपनीच्या मालकिणीची आत्महत्या

प्रसिद्ध सायकल कंपनी अॅटलसचे (Atlas Cycle Company) मालक संजय कपूर यांच्या पत्नी नताशा (वय 57) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे (Natasha Kapoor Suicide). प्राथमिक तपासात पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवली आहे.

काही गोष्टी सांगता येत नाहीत, सुसाईड नोट लिहून Atlas सायकल कंपनीच्या मालकिणीची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jan 22, 2020 | 7:25 PM

नवी दिल्ली : प्रसिद्ध सायकल कंपनी अॅटलसचे (Atlas Cycle Company) मालक संजय कपूर यांच्या पत्नी नताशा (वय 57) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे (Natasha Kapoor Suicide). प्राथमिक तपासात पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांना घटनास्थळावरुन सुसाईड नोट आढळून आली. ‘काही गोष्टी अशा आहेत ज्या सांगता येत नाहीत, मुलांची काळजी घ्या’, असं आ सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे. मात्र, ज्या खोलीत नताशा यांनी आत्महत्या केली त्या खोलीचा दरवाजा उघडा होता, त्यामुळे पोलीस वेगवेगळ्या बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत (Natasha Kapoor Suicide).

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅटलस कंपनीचे मालक संजय कपूर हे त्यांच्या कुटुंबासोबत दिल्लीच्या 3 औरंगजेब लेनमध्ये राहतात. मंगळवारी दुपारच्या जेवणाला नताशा आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला, त्यांना फोन केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर नताशा या त्यांच्याच खोलीत मृतावस्थेत आढळल्या. त्यांचा मृतदेह ओढणीच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. कुटुंबियांनी ओढणीला कापून नताशा यांचा मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी नताशा यांना मृत घोषित केलं.

सध्या तुघलक रोड पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणी तपास करत आहे. मात्र, नताशा यांनी आत्महत्या केली, की त्यांच्यासोबत आणखी काही घडलं हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांच्या मते, आर्थिक चणचण या आत्महत्येचं कारण असू शकतं. बुधवारी नताशा कपूरच्या मृतदेहाचं शवविच्छेदन आरएमएल रुग्णालयात करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आला, लोधी रोड येथील स्मशान भूमीत नताशा यांचे अंतिम संस्कार झाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.