एटीएम कार्डद्वारे बिल पेमेंट करताना सावधान! ग्राहकाला 25 हजारांचा फटका

तुम्हीही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये बिलचे पेमेंट करताना एटीएम, डेबिट कार्ड अथवा क्रेडीट कार्डने करताना आपला पीन नंबर वेटरला (Atm card fraud mumbai) सांगता का? मग सावधान...

Atm card fraud mumbai, एटीएम कार्डद्वारे बिल पेमेंट करताना सावधान! ग्राहकाला 25 हजारांचा फटका

मुंबई : तुम्हीही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये बिलचे पेमेंट करताना एटीएम, डेबिट कार्ड अथवा क्रेडीट कार्डने करताना आपला पीन नंबर वेटरला (Atm card fraud mumbai) सांगता का? मग सावधान… तुम्हीही लुटले जाऊ शकता. घाटकोपरमध्ये अशाप्रकारे पेमेंट केल्याने एका ग्राहकाला तब्बल 25 हजार रुपयांचा फटका बसला (Atm card fraud mumbai) आहे. संतोष बोचरे असे या ग्राहकाचे नाव आहे.

घाटकोपरमधील आर के वाईन अँड डाईन या रेस्टॉरंटमध्ये संतोष बोचरे हे नेहमीप्रमाणे जेवण करण्यात आले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी बिलाचे पेमेंट करण्यासाठी वेटरला आपले एटीएम कार्ड दिले. त्यासोबत त्यांनी आपला पिन नंबरही वेटरला सांगितला.

मात्र घरी जाण्याच्या गडबडीत ते आपले एटीएम कार्ड वेटरकडेच विसरुन निघून गेले. याच गोष्टीचा गैरफायदा घेत त्या वेटरने रात्रीत त्यांच्या एटीएममधून तब्बल 25 हजार रुपये काढण्यात (Atm card fraud mumbai) आले.

दुसऱ्या दिवशी जेव्हा संतोष यांनी आपले एटीएम हरवल्याची तक्रार बँकेत केली. त्यावेळी त्यांना त्यांच्या अकाऊंटमधून 25 हजार रुपये काढल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संतोष यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर हे पैसे त्या वेटरनेच काढल्याचे समोर आले.

या प्रकरणी आर के वाईन अँड डाइनमधील वेटर अंकित मिश्राला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा एटीएम कार्ड, डेबिट कार्ड किंवा क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट करत असताना सावधानता बाळगणे किती गरजेचे आहे हे समोर आले (Atm card fraud mumbai) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *