नवऱ्याचा त्रास, प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी विवाहितेने वेश्येला पेटवले

नवऱ्याचा त्रास, प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी विवाहितेने वेश्येला पेटवले

औरंगाबाद : प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एक विवाहित महिलेने देहविक्री करणाऱ्या महिलेची हत्या करून, तिचा चेहरा पेटवून दिला. इतकंच नाही तर ती स्वतःच असल्याचं भासवून आत्महत्येचं नाटक करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकारात देहविक्री करणाऱ्या महिलेचा हकनाक बळी गेला. 24 मे रोजी घडलेल्या घडली आहे. सोनाली शिंदे अस आरोपी महिलेचं नाव आहे. तिने आपल्या प्रेमातील अडसर असलेल्या पतीला दूर करण्यासाठी सोनाली आणि तिच्या प्रियकराने हा सुनियोजित कट रचला.

त्यासाठी सोनालीने दोन चिठ्ठ्या लिहून पतीच्या त्रासाचा उल्लेख केला. त्यानंतर सिडको बसस्थानक परिसरातून एका वारांगनेला सोबत नेऊन तिचा खून करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी तो चेहरा जाळून विद्रूप करून हे दोघे पळून गेले.

पोलिसांनी या घटनेचा छडा लावला असून सोनालीसह तिच्या प्रियकराला अटक केली. मात्र या घटनेत एका देहविक्री करणाऱ्या महिलेचा हकनाक जीव गेला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *