नवी मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर रिक्षावाल्याचा बलात्कार, नंतर दुचाकीस्वारांकडून गँगरेप

घरोघरी तूप विकणाऱ्या 19 वर्षीय तरुणीवर नवी मुंबईत बलात्कार करण्यात (Gang rape on navi mumbai girl) आला. विशेष म्हणजे या तरुणीवर पहिले रिक्षावाल्याने बलात्कार केला.

नवी मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर रिक्षावाल्याचा बलात्कार, नंतर दुचाकीस्वारांकडून गँगरेप
Follow us
| Updated on: Feb 26, 2020 | 3:49 PM

नवी मुंबई : घरोघरी तूप विकणाऱ्या 19 वर्षीय तरुणीवर नवी मुंबईत बलात्कार (Gang rape on navi mumbai girl) केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या तरुणीवर पहिले रिक्षावाल्याने बलात्कार केला. त्यानंतर दुचाकीस्वारांकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच रिक्षा चालकाने तिचे दागिनेही लुटले. नवी मुंबई पोलिसांनी या घटनेतील तिनही आरोपींना अटक केली असून अधिक चौकशी करत (Gang rape on navi mumbai girl) आहेत.

घरोघरी तूप विकणाऱ्या 19 वर्षीय पीडित तरुणीची घाटकोपर रेल्वे स्थानकातून लोकल पकडताना तिच्या नातेवाईकांपासून चुकामूक झाली. यावेळी ही तरुणी गर्दीत हरवली. तरुणी हरवल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी कुर्ला पोलीस ठाण्यात केली.

हरवलेली तरुणी तिच्या नातेवाईकांचा शोध घेत मुंब्रा रेल्वे स्थानकात पोहचली आणि तिने तिथेच रात्र काढली. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांना शोधण्यासाठी तिने दिवा रेल्वे स्थानक गाठले मात्र तिथे तिला नातेवाईक सापडले नाहीत. तरुणीकडे खर्चाचे पैसे नसल्याने तिने तिच्या नाकातील सोन्याचे फुलं विकण्यासाठी दिवा रेल्वे स्थानकातील वृद्ध भिकारी महिलेला विनंती केली. भिकारी महिलेने सोन्याचे नाकातील फुलं विकण्यासाठी तिच्या महापे येथील झोपडपट्टीतील घरी नेले. मात्र सोन्याचे फुलं विकणे शक्य न झाल्याने भिकारीन राहत असलेल्या झोपडपट्टीमधून पीडिता पायी चालत महापे परिसरातील साईसागर हॉटेल चौकात रात्री 8:30 च्या दरम्यान आली.

या चौकात तिला एक रिक्षावाला भेटला यावेळी पीडितेने जवळपास असणाऱ्या रेल्वे स्थानकावर नेण्याची विनंती केली. पीडिता ही एकटी असल्याचे पाहून रिक्षावाल्याने तिला रिक्षात बसवले आणि धमकावून महापे परिसरातील पडीक इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला असा आरोप आहे. तसेच तिचे सोन्याचे कानातले, नाकातील सोन्याच फुलं आणि पायातील चांदीचे पैंजण जबरस्तीने काढून घेतले. त्यानंतर तिला राम मंदीर परिसरात सोडून रिक्षावाला पळून गेला.

या घटनेनंतर रात्री 12च्या सुमारास स्टेशनला कसे जायचे असं पीडिता विचारता करत असताना अॅक्टिवावरून जाणाऱ्या दोन मुलांनी तिला स्टेशनवर सोडतो असे सांगत तिला ट्रिपल सीट बसवले. तसेच घणसोली रेल्वे स्थानकाच्या दिशेने नेऊन पुढे ठाणे बेलापूर मार्गावरील पाईपलाईन शेजारी नेले. यावेळी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला, असाही आरोप करण्यात आला आहे.

या घटनेचा गुन्हा कुर्ला पोलीस ठाण्यातून वर्ग होऊन रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस सहआयुक्त वाशी विभाग यांच्या अधिपत्याखाली रबाळे एमआयडीसी परिसरात पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. यानंतर तिन्ही अनोळखी व्यक्तींचा शोध घेऊन गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि अॅक्टिवा जप्त करण्यात आली. आरोपींना 29 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.