पैशांसाठी बारबालेकडून ब्लॅकमेलिंग, कंटाळलेल्या प्रियकराकडून हत्या

दहिसरमध्ये एका बारबालाची हत्या करण्यात (Bargirl murder in dahisar) आली आहे. विशेष म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडने तिची हत्या केल्या समोर आलं आहे.

पैशांसाठी बारबालेकडून ब्लॅकमेलिंग, कंटाळलेल्या प्रियकराकडून हत्या

मुंबई : दहिसरमध्ये एका बारबालाची हत्या करण्यात (Bargirl murder in dahisar) आली आहे. विशेष म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडने तिची हत्या केल्याचे समोर आलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दहिसर पोलिसांनी आरोपी बॉयफ्रेंडला कोलकाता येथून अटक केली असून अधिक तपास करत आहेत. सपन परेश रुइदास असं या आरोपी बॉयफ्रेंडचे (Bargirl murder in dahisar) नाव आहे.

सपन रुइदास एका रोजीना शेख नावाच्या बारबालेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. बारबाला आरोपी बॉयफ्रेंडला सतत ब्लॅकमेल करत होती. सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आरोपी बॉयफ्रेंडने बारबालेची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर आरोपी मृत महिलेचे सोने, पैसे आणि मोबाईल घेऊन कोलकाता फरार झाला होता.

मृत महिलेच्या वस्तू पोलिसांनी आरोपीकडून जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये दोन स्मार्टफोन, एक लाख 20 हजार कॅश, जवळपास लाखोंचे सोनेही होते. त्यासोबतच सपन घराची चावीही घेऊन फरार झाला होता.

आरोपी सपन मृत रोजीनासोबत दहिसर येथील जनकल्याण इमारतीत राहत होता. आरोपीची रोजीनासोबत दहिसर येथील एका बारमध्ये ओळख झाली होती. रोजीना तेथे वेटरचे काम करत होती. मृतक रोजीना आरोपीला सतत पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती. ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्याने तिची हत्या केली. त्यासोबत तो तिचा मोबाईल, पैसे आणि घराची चावी घेऊन कोलकाता फरार झाला होता, असं पोलिसांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *