बीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या

बीड : भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांची अंबाजोगाईत हत्या करण्यात आली आहे. जोगदंड यांच्यावर अज्ञातांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात जोगदंड यांचा मृत्यू झाला. बीडच्या अंबाजोगाई परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. विजय जोगदंड यांच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातील अज्ञात आरेपी सध्या फरार आहेत. आज शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. …

बीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या

बीड : भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांची अंबाजोगाईत हत्या करण्यात आली आहे. जोगदंड यांच्यावर अज्ञातांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात जोगदंड यांचा मृत्यू झाला. बीडच्या अंबाजोगाई परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. विजय जोगदंड यांच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातील अज्ञात आरेपी सध्या फरार आहेत. आज शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

बीडच्या अंबाजोगई परिसरात काही किरकोळ भांडणं सुरु होती. विजय जोगदंड हे तिथे भांडणं सोडवायला गेले होते. मात्र, या भांडणातील अज्ञातांनी जोगदंड यांनांच लक्ष्य केले. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या अज्ञातांनी तलवारी काढल्या आणि नगरसेवक जोगदंड यांच्यावर तलवारीने सपासप वार केले, यामुळे जोगदंड तेथेच कोसळले. जोगदंड यांच्यावर वार करुन अज्ञातांनी घटनास्थळावरुन पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजय जोगदंड यांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ बीडच्या शासकीय रुग्णालात दाखल केले. मात्र तिथे उपचाराअंती त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला जात आहे. मात्र, अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. तरी पोलीस ते अज्ञात कोण होते आणि ही हत्या का झाली, याचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *