कांद्याच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी, जेएनपीटीतून 4 कोटींचे घबाड जप्त

जेएमपीटी बंदरात काल (16 जून) 13 मेट्रिक रक्त चंदनाचा साठा जप्त करण्यात आला (Blood Sandalwood Smuggling JNPT) आहे.

कांद्याच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी, जेएनपीटीतून 4 कोटींचे घबाड जप्त

रायगड : जेएमपीटी बंदरात काल (16 जून) 13 मेट्रिक रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला (Blood Sandalwood Smuggling JNPT) आहे. न्हावा शेवा डीआरआय विभागाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. या प्रकरणी डीआरआय विभागाने दोन संशयितांना अटक केली आहे. या रक्तचंदनाची किंमत अंदाजे चार कोटींच्या घरात असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जेएनपीटी बंदरातील कार्गोमधून शारजा-युएई येथे 29 मेट्रिक टन कांदा पाठवण्यात येणार होता. मात्र कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने दुर्मीळ रक्तचंदनाची तस्करी करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती न्हावा-शेवा येथील डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. म्हणून डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून छापा टाकला.

या छाप्यात 29 मेट्रिक टनाऐवजी फक्त 17 टन कांदा आढळून आला. तर कंटेनरमध्येच कापडात गुंडाळून लपवून ठेवलेला 13 मेट्रिक टन रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी डीआरआय अधिकाऱ्यांनी रक्तचंदनाची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दोन संशयितांना अटक केलीे. त्यांची चौकशी करण् तपासणीसाठी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने शारजात निर्यात करण्याच्या तयारीत असतानाच हा माल पकडण्यात आला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत चार कोटीच्या घरात आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बामत्या : 

दुबईतील खजूराच्या नावाखाली परदेशी सिगारेटची तस्करी, जेएनपीटी बंदरातून 11 कोटींचं घबाड जप्त

जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली गुटख्याची तस्करी, पालघरमध्ये 15 लाखांचा गुटखा जप्त

कमरपट्ट्यातून सोन्याची तस्करी, तीन किलो सोन्यासह दोघांना अटक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *