हप्ता मागणाऱ्या पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

उल्हासनगर : पोलिसांच्या जाचाला कंटाळून उल्हासनगरमधील तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सतीश खेडकर असे तरुणाचे नाव असून, गळफास लावून त्याने आत्महत्या केली. उल्हासनगरमधील चोपडा कोर्ट परिसरात ही घटना घडली. सतीश खेडकर हा उल्हासनगरमधील हॉटेल व्यावसायिक होता. उल्हासनगरमधील पोलिस वारंवार हप्ता मागत असल्याने सतीश खेडकर कंटाळला होता. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून सतीशने अखेर टोकाचं पाऊल …

हप्ता मागणाऱ्या पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

उल्हासनगर : पोलिसांच्या जाचाला कंटाळून उल्हासनगरमधील तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सतीश खेडकर असे तरुणाचे नाव असून, गळफास लावून त्याने आत्महत्या केली. उल्हासनगरमधील चोपडा कोर्ट परिसरात ही घटना घडली.

सतीश खेडकर हा उल्हासनगरमधील हॉटेल व्यावसायिक होता. उल्हासनगरमधील पोलिस वारंवार हप्ता मागत असल्याने सतीश खेडकर कंटाळला होता. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून सतीशने अखेर टोकाचं पाऊल उचलत, गळफास लावून जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, सतीश खेडकरच्या नातेवाईकांनी आरोप असलेल्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. आरोपी पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत सतीश खेडकरचे नातेवाईक मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलनाना बसले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *