माझं लग्न का लावत नाही, प्रश्न विचारत मुलाने आईचा गळा आवळला!

सोलापूर : कोण कुणाचा आणि कशासाठी खून करेल याचा पत्ता नाही. सोलापुरात एका मुलाने माझं लग्न का करत नाही अशी विचारणा करत, स्वत:च्या आईचा गळा घोटून खून केला. नागमणी विजय कायत असे दुर्देवी मातेचे नाव असून, आरोपी मोहित विजय कायतला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरातील कायत कुटुंब …

माझं लग्न का लावत नाही, प्रश्न विचारत मुलाने आईचा गळा आवळला!

सोलापूर : कोण कुणाचा आणि कशासाठी खून करेल याचा पत्ता नाही. सोलापुरात एका मुलाने माझं लग्न का करत नाही अशी विचारणा करत, स्वत:च्या आईचा गळा घोटून खून केला. नागमणी विजय कायत असे दुर्देवी मातेचे नाव असून, आरोपी मोहित विजय कायतला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सोलापुरातील कायत कुटुंब माळवाडी इथे स्थायिक झाले आहे. कायत कुटुंबातील लक्ष्मीकांत कायत म्हणजे आरोपीचे काका यांच्याशी आरोपी मोहित याचे येणे जाणे होते. एकेदिवशी वाद झाल्याने त्याचे तिकडील येणे जाणे बंद झाले होते. मोहितला अंमली पदार्थाच्या सेवनाचं व्यसन लागलं होतं. त्यामुळे तो उपचारासाठी सोलापूरला आला होता.

सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याने उपचार घेतले. त्याला पाहण्यासाठी त्याची 52 वर्षीय आई नागमणी कायत सोलापुरातील जोडभावी पेठ येथील घरी आली होती. रात्री सर्व जण झोपी गेले होते. वडील विजय कायत हे कबीर मठात झोपायला गेले. सकाळी सातच्या सुमारास जोडभावी पेठेतील घरी आल्यानंतर भावजय रोहिणी आरडाओरड करत असल्याचे दिसून आले.घरात जाऊन पाहिल्यानंतर नागमणी या बेशुद्धावस्थेत होत्या.

त्यांना मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले. मोहितनेच स्वत:च्या आईचा घरातील केबलच्या वायरने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्याने या हत्याकांडाचं दिलेलं कारणही धक्कादायक आहे. लग्न लावून का देत नाही असा जाब विचारत त्याने आईचा गळा आवळला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *