दोन कोटींसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, डोक्यात गोळी झाडून हत्या

दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाराचे अपहरण करण्यात आले आहे. तसेच डोक्यात गोळी झाडून हत्या (businessman murder pune) केली आहे.

दोन कोटींसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, डोक्यात गोळी झाडून हत्या

पुणे : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाराचे अपहरण करण्यात आले आहे. तसेच डोक्यात गोळी झाडून हत्या (businessman murder pune) केली आहे. ही घटना साताऱ्यातील लोणंद जवळच्या पाडेगाव येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक चौकशी सुरु आहे. चंदन शेवानी असं हत्या करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे (businessman murder pune) नाव आहे.

चंदन शेवानी यांचा चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. पुण्यातील साधूवासवानी चौकात परमार पॅराडाईझ येथे ते कुटुंबीयासोबत राहत होते. काल (4 जानेवारी) संध्याकाळपासून त्यांचा फोन लागत नसल्याने कुटुंबीयांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रारीनंतर चंदन यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान साताऱ्यातील पाडेगाव येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. या मृतदेहाचा फोटो पोलिसांनी पुणे शहर, ग्रामीण, लोणावळा पोलिसांना पाठवला. त्यावेळी हा पुणे येथील व्यापारी चंदन असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी मृतदेहा शेजारी एक चिट्टी सापडली असून त्यात (दोन कोटी दिले नाही यासाठी भाईच्या ऑर्डरवरुन ठोकावे लागले) असं लिहिलं होते. त्यामुळे दोन कोटींच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरकरुन खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून अधिक तपास सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *