CCTV : लघुशंकेवरुन वाद, दोघांना दगड-दांडक्याने बेदम मारहाण

CCTV : लघुशंकेवरुन वाद, दोघांना दगड-दांडक्याने बेदम मारहाण

मुंबई : भिवंडी शहरातील चावींद्रा  येथे शुल्लक वादातून तीन ते चार जणांच्या टोळक्याने दोघाजणांना बेदम मारहाण करत एकावर दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याने त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. विनिकेत मोरे असं गंभीर जखमी युवकाचं नाव आहे. हा घडलेला मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. त्या आधारे भिवंडी तालुका पोलीस स्टेशन येथे अज्ञातांवर गुन्ह्याची नोंद करण्यात अली आहे.

ब्राह्मण आळी येथील संकेत सुरेश वल्लाळ आणि विनिकेत मोरे हे दोघेजण सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. तेथे जात असताना लघुशंकेसाठी अपना वजनकाटा या ठिकाणी हे दोघे युवक थांबले असताना त्या ठिकाणी आलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्यांच्याशी शुल्ल्लक वाद घालून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता या हल्लेखोरांनी परिसरातील दगडी उचलून विनिकेत मोरे याच्या डोक्यासह हातापायावर जोरदार प्रहार करीत बेशुद्धावस्थेत टाकून त्या ठिकाणाहून पोबारा केला.

संकेत सुरेश वल्लाळ आणि विनिकेत मोरे या दोघांनाही शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज घाटकर हे तपास करीत असून अजून एकही आरोपीस अटक करण्यात आली नाही. या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्हीत कॅमेरात कैद असून तो सर्वत्र व्हायरल झाल्याने या घटनेची दाहकता पाहता अज्ञात आरोपीं विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी नागरीकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *