तरुणाला अमानुष मारहाण करणारा ठाणेदार निलंबित

चंद्रपूर :  पिट्टीगुडा येथे रविवारी एक अमानवीय घटना समोर आली होती. पिट्टीगुडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हे त्यांच्या पथकासह एका तरुणाच्या घरी तपासासाठी गेले होते. त्यावेळी नशेत असलेल्या त्या तरुणाला पोलिसांकडून जबर मारहाण करण्यात आली होती. इतकंच नाही तर ठाणेदार अनिल आळंदे यांनी पीडित तरुणाच्या डोक्यावरील केस कातडीसह कापले. यामध्ये तरुणाला मोठी दुखापत झाली. आता याप्रकरणी …

तरुणाला अमानुष मारहाण करणारा ठाणेदार निलंबित

चंद्रपूर :  पिट्टीगुडा येथे रविवारी एक अमानवीय घटना समोर आली होती. पिट्टीगुडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हे त्यांच्या पथकासह एका तरुणाच्या घरी तपासासाठी गेले होते. त्यावेळी नशेत असलेल्या त्या तरुणाला पोलिसांकडून जबर मारहाण करण्यात आली होती. इतकंच नाही तर ठाणेदार अनिल आळंदे यांनी पीडित तरुणाच्या डोक्यावरील केस कातडीसह कापले. यामध्ये तरुणाला मोठी दुखापत झाली. आता याप्रकरणी ठाणेदार अनिल आळंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

देविदास कंदलवार हा तरुण जिवती तालुक्यातील आंबेझरी गावचा रहिवासी आहे. देविदास कंदलवार हा दारुच्या नशेत गावकऱ्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई न करता ठाणेदार अनिल आळंदे तीन शिपायांसह सरळ देविदासच्या घरी तपासासाठी गेले. ठाणेदार देविदासच्या घरी पोहोचले तेव्हाही तो नशेतच होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अमानुष मारहाण केली. इतक्यावरच न थांबता अनिल आळंदे यांनी खिशातून चाकू काढला आणि देविदासच्या डोक्यावरील केसांसोबत त्याची कातडीही कापून फेकली.

देविदासला रक्तबंबाळ झाल्याचं पाहून पत्नीने त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तिलाही मारहाण केली. तसेच, ग्रामस्थांनाही पोलिसांनी हाकलून लावलं. देविदासचा रक्तस्त्राव वाढत असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी रात्री उशिरा त्याला गडचांदूर ग्रामीण रुग्णालय दाखल केले.

पोलिसांनी गडचांदूर रुग्णालयात हे प्रकरण मिटविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांच्या सतर्कतेने हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी गडचांदूरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तपास हाती घेतला. तपासात ठाणेदार अनिल आळंदे हे दोषी आढळल्याने त्यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार अनिल आळंदे यांना निलंबित करण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *