पायात बूट, कमरेला पट्टा, अंगात वर्दी, पोलीस स्टेशनमध्येच पोलिसाचा गळफास

पोलिसाने चक्क पोलीस स्टेशनमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे.

, पायात बूट, कमरेला पट्टा, अंगात वर्दी, पोलीस स्टेशनमध्येच पोलिसाचा गळफास

चंद्रपूर : पोलिसाने चक्क पोलीस स्टेशनमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे. सुरेश भांबुळे (50) असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वरोरा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली.

सुरेश भांबुळे यांनी गुन्हे शोधपथक (DB) खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश भांबुळे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर होते. काल रात्री 11 वाजता DB रुम मधील कर्मचारी घरी गेले. त्यानतंर आज सकाळी 9.30 च्या सुमारास हे कर्मचारी पुन्हा कार्यालयात आले असता, सुरेश भांबुळेंनी गळफास घेतल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.

दरम्यान, सुरेश भांबुळे यांनी आत्महत्या का केली याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. काही दिवसांपासून रजेवर गेलेले भांबुळे कामावर परतताच, थेट पोलीस ठाण्यातच आत्महत्या करतात, यामागे नेमकं कारण काय असू शकतं, याची चौकशी सुरु आहे.

पोलिसांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना सध्या घडत आहेत. कामाचा ताण, वरिष्ठांचा दबाव अशी अनेक कारणं यामागे असल्याचं यापूर्वी उघड झालं आहे. मात्र सुरशे भांबुळेंनी आत्महत्या का केली त्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *