प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई, हिजबूलचे दोन दहशतवादी ताब्यात

नवी दिल्ली : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबतच्या जॉईंट ऑपरेशन दरम्यान हिजबूल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं. या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरच्या शोपियां येथून ताब्यात घेण्यात आलं. यापैकी एक किफायतुल्ला बुखारी आणि दुसरा अल्पवयीन आहे. यांच्याजवळून एक पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आले आहेत. हे दोन्ही दहशतवादी एरीया कमांडर नावेदच्या संपर्कात …

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई, हिजबूलचे दोन दहशतवादी ताब्यात

नवी दिल्ली : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबतच्या जॉईंट ऑपरेशन दरम्यान हिजबूल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं. या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरच्या शोपियां येथून ताब्यात घेण्यात आलं. यापैकी एक किफायतुल्ला बुखारी आणि दुसरा अल्पवयीन आहे. यांच्याजवळून एक पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आले आहेत.

हे दोन्ही दहशतवादी एरीया कमांडर नावेदच्या संपर्कात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नावेद हा काश्मीरी पोलिसात कार्यरत होता, 2017 साली तो दहशतवादी बनला. या दोन्ही दहशतवाद्यांपैकी एकाला एनसीआरमध्ये पाहण्यात आलं होतं. हे दहशतवादी एनसीआरमधून शस्त्र खरेदी करुन काश्मीरमध्ये दहशतवादी घटना घडवून आणायचे. हे संघटन दिल्लीसह उत्तर भारतात दहशतवादी घटना घडवून आणण्याची योजना आखत होते.

दिल्ली स्पेशल सेलच्या या कारवाईत शोपिया पोलिसांनीही मदत केली. सध्या शोपिया पोलीस यांची चौकशी करत आहे. हे दहशतवादी एनसीआरमध्ये कुणाकडून शस्त्र खरेदी करायचे याचा तपास स्पेशल सेल करत आहे.

याआधी 6 सप्टेंबर 2018 ला आयएसआय आणि जम्मू-काश्मीरचे दोन दहशतवादी परवेश राशिद आणि जमसीद यांना लाल किल्ला परीसरातून अटक करण्यात आली होती. तर 24 नोव्हेंबर 2018 ला ताहीर, हरीस आणि आसिफ या तिघांना स्पेशल सेलच्या माहितीवरुन जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेडसोबत अटक करण्यात आली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *