VIDEO : पगाराच्या बदल्यात शरीर संबंधाला नकार, तरुणीला भररस्त्यात मारहाण

ग्रेटर नोएडा : पगाराच्या बदल्यात शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका तरुणीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पीडित तरुणीला मारहाण होताना दिसत आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्कमध्ये घडली. पीडित तरुणी जेथे नोकरी करत होती त्या ठिकाणी तिचा …

VIDEO : पगाराच्या बदल्यात शरीर संबंधाला नकार, तरुणीला भररस्त्यात मारहाण

ग्रेटर नोएडा : पगाराच्या बदल्यात शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका तरुणीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पीडित तरुणीला मारहाण होताना दिसत आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्कमध्ये घडली.


पीडित तरुणी जेथे नोकरी करत होती त्या ठिकाणी तिचा पगार अडकवून ठेवण्यात आला होता. महिना होऊन 12 दिवस झाले तरी तिला पगार देण्यात आला नाही. तरुणीने वारंवार पैशांची मागणी केली. मात्र, तिला पगार देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर ही तरुणी थेट कामाच्या ठिकाणी जाऊन पैशांची मागणी केली. त्यावेळी वाद झाला आणि आरोपींना तिला केस पकडून रस्त्यावर लाठ्या काठ्यांनी मारले.

मारहाणीनंतर पीडित तरुणीने नॉलेज पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, अद्यापही कोणालाही अटक झालेली नाही. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विट करत याविरोधात तक्रार दाखल केल्याची आणि तपास सुरु असल्याची माहिती दिली. पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे, “मी मार्च महिन्यापासून एका सलूनमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते. मागील महिन्यात पगाराची मागणी केल्यानंतर टाळाटाळ करण्यात आली. अखेर त्यांनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मी त्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर वसीमने शेरा नावाच्या त्याच्या मित्रासोबत मला बेदम मारहाण केली. यात वसीमचा अन्य एक नातेवाईकही सहभागी होता.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *