जेवणावरुन वाद, डोक्यात दगडी पाटा घालून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

डोक्यात दगडी पाटा टाकून पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार (Ambernath Husband Killed Wife) अंबरनाथमध्ये घडला आहे.

जेवणावरुन वाद, डोक्यात दगडी पाटा घालून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

अंबरनाथ : डोक्यात दगडी पाटा टाकून पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार (Ambernath Husband Killed Wife) मुंबईच्या जवळच असलेल्या अंबरनाथमध्ये घडला आहे. याप्रकरणी आरोपी सचिन गोंडाने याला अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

अंबरनाथमधील गायकवाड पाडा परिसरात 28 वर्षीय चंद्रकला गोंडाने आणि तिचा पती सचिन हे आपल्या दोन मुलांसह राहतात. काल (17 जुलै) दुपारच्या सुमारास आरोपी सचिन आणि पत्नी चंद्रकला यांच्यात जेवणावरुन भांडण झाले. यानंतर सचिनला त्याचा राग अनावर झाला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

त्याने पत्नी चंद्रकलाच्या गळ्याला ओढणी गुंडाळत तिला लोखंडी ग्रीलला बांधले. यानंतर तिच्या डोक्यात दगडी पाटा टाकत लाकडी दांडक्याने प्रहार केला. या घटनेमुळे अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

काही वेळानंतर सचिनचा भाऊ त्याच्या घरी आला. त्याने दरवाजा ठोठावला. मात्र त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. त्याला संशय आल्याने त्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत (Ambernath Husband Killed Wife) आहेत.

संबंधित बातम्या : 

नागपुरात कौटुंबिक कलाहातून निर्दयी बापाकडून 9 महिन्याच्या मुलीची पाण्यात बुडवून हत्या

धुळ्यात ‘स्पेशल 26’, भुजबळांच्या नावावर रेशन दुकानदाराकडून दोन लाखांच्या खंडणीची मागणी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *