सिनेमागृह, दोन बंगले, हॉटेल, फार्म हाऊसवर टाच; डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांची 22 कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने आज मोठी कारवाई केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांच्या सात मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. त्याची किंमत 22.42 कोटी एवढी आहे. पीएमएलए कायद्यांर्तगत ही कारवाई करण्यात आली आहे.

सिनेमागृह, दोन बंगले, हॉटेल, फार्म हाऊसवर टाच; डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांची 22 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई: ईडीने आज मोठी कारवाई केली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी (Money Laundering) अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांच्या सात मालमत्ता जप्त (Seven Immovel Properties)  केल्या आहेत. त्याची किंमत 22.42 कोटी एवढी आहे. पीएमएलए कायद्यांर्तगत ही कारवाई करण्यात आली आहे. (ED attaches assets worth Rs 22.42-crore of Iqbal Mirchi”s family)

ईडीने जप्त केलेल्या या संपत्तीत एक सिनेमागृह, हॉटेल, निर्माणाधीन हॉटेल, एक फार्महाऊस, दोन बंगले आणि पाचगणीतील 3.5 एकरच्या जमिनीचा समावेश आहे. यापूर्वी ईडीने इक्बाल मिर्चीची 776 कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यात 203 कोटींच्या विदेशातील संपत्तीचाही समावेश होता. त्यामुळे आता इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण 798 कोटीची जप्त झाली आहे.

ईडीने 26 सप्टेंबर 2019 रोजी इक्बाल मिर्ची आणि इतरांची पीएमएलए अंतर्गत चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि हुमायूँ मर्चंटसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. पीएमएलएच्या विशेष न्यायालयात 9 डिसेंबर 2019 रोजी एक तक्रार दाखल केली होती. त्याची कोर्टाने दखल घेतली होती. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात सहभागी असल्याप्रकरणी इक्बाल मिर्चीचे दोन्ही मुले, आसिफ मेमन, जुनैद मेम आणि पत्नी हाजरा मेमनच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. याप्रकरणी अद्याप तपास सुरू आहे. (ED attaches assets worth Rs 22.42-crore of Iqbal Mirchi”s family)

संबंधित बातम्या:

डी-कंपनीचा हस्तक इक्बाल मिर्चीच्या साथीदाराला अटक

गँगस्टर इक्बाल मिर्चीचे प्रफुल्ल पटेल यांच्याशी थेट संबंध?

वाधवान बंधूंना सीबीआयकडून अटक, महाबळेश्वरमध्ये जाऊन कारवाई

(ED attaches assets worth Rs 22.42-crore of Iqbal Mirchi”s family)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *