पैशासाठी नोकराकडून वयोवद्ध मालकाचं अपहरण, फ्रिजमध्ये कोंडल्याने मृत्यू

दिल्ली : दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या एका 91 वर्षीय वृद्धाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही हत्या त्यांच्या घरातील नोकराने (Servant) केल्याचे उघड झालं आहे. विशेष म्हणजे घरातील नोकराने पैशांसाठी त्याच्या मालकाला (Old age kidnapped) फ्रिजमध्ये बंद करुन ठेवलं. यामुळे मालकाचा श्वास गुदमरुन मृ्त्यू झाला आहे. कृष्ण खोसला असे या मालकाचे नाव असून  किशन असं …

पैशासाठी नोकराकडून वयोवद्ध मालकाचं अपहरण, फ्रिजमध्ये कोंडल्याने मृत्यू

दिल्ली : दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या एका 91 वर्षीय वृद्धाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही हत्या त्यांच्या घरातील नोकराने (Servant) केल्याचे उघड झालं आहे. विशेष म्हणजे घरातील नोकराने पैशांसाठी त्याच्या मालकाला (Old age kidnapped) फ्रिजमध्ये बंद करुन ठेवलं. यामुळे मालकाचा श्वास गुदमरुन मृ्त्यू झाला आहे. कृष्ण खोसला असे या मालकाचे नाव असून  किशन असं या आरोपी नोकराचं नाव आहे.

किशनने 31 ऑगस्ट रोजी वृद्ध कृष्ण खोसला (91) आणि त्यांची पत्नी सरोज खोसला (87) यांच्या जेवणातून गुंगीचे औषध दिले. यामुळे ते दोघेही बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने घरातून सव्वा लाख रुपयांची रोख रक्कम आणि पाच ते सहा लाख रुपयांचे दागिने चोरले. यानंतर मित्रांच्या मदतीने वृद्धाला फ्रिजमध्ये बंद केलं आणि तो फ्रिज टेम्पोमध्ये ठेवून किशन फरार झाला.

आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश

यानंतर पोलिसांनी काही तासात आरोपी किशनला उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. त्यावेळी त्याच्याकडून तब्बल चार ते पाच लाखांचे दागिने आणि सव्वा लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. वृद्ध मालकाचे अपहरण करुन त्याच्याकडून मोठी किंमत वसूल करण्याचा आमचा प्लॅन होता. त्यासाठी आम्ही वृद्धाला फ्रिजमध्ये बंद केले होते, असं आरोपीने म्हटलं आहे.

दिड महिन्यापूर्वी नियोजन

आरोपी 91 वर्षाच्या कृष्णा खोसला यांच्या दररोजच्या ओरडण्याला वैतागला होता. त्यामुळे त्याने अपहरण करुन पैसे मागण्याचे नियोजन केले होते. जेव्हा त्याने वृद्धाचे अपहरण करुन त्यांना फ्रिजमध्ये बंद केले. त्यानंतर काही वेळाने गुदमरुन वृद्धाचा मृत्यू झाला.

फ्रिज आणि मृतदेह ताब्यात

पोलिसांनी रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच फ्रिजही पोलिसांना मिळाला आहे. या संपूर्ण घटनेचा पोलीस तपास करत असून त्याच्या मित्रांचा शोध घेत आहेत. दरम्यान खोसला कुटुंबीयांच्या एक मुलगा दिल्लीत राहतो, तर दुसरा मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये राहतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *