रेड सॅण्डबो मांडूळ, किंमत 30 लाख, साताऱ्यात तस्करांना बेड्या   

कराड (सातारा) : साताऱ्यातील कराड ग्रामीण पोलिसांनी दोन सर्प तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. या तस्करांकडून मांडूळ जातीचा सर्प जप्त केला असून, या मांडूळ सापाची किंमत तब्बल 30 लाखांच्या घरात आहे. कराड ग्रामीण पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून या सर्प तस्करांच्या मुसक्या आवळल्या. कराड तालुक्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावरील  मालखेड गावच्या हद्दीत सम्राट लॉजच्या समोर मोकळ्या जागेत हे […]

रेड सॅण्डबो मांडूळ, किंमत 30 लाख, साताऱ्यात तस्करांना बेड्या    
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

कराड (सातारा) : साताऱ्यातील कराड ग्रामीण पोलिसांनी दोन सर्प तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. या तस्करांकडून मांडूळ जातीचा सर्प जप्त केला असून, या मांडूळ सापाची किंमत तब्बल 30 लाखांच्या घरात आहे. कराड ग्रामीण पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून या सर्प तस्करांच्या मुसक्या आवळल्या.

कराड तालुक्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावरील  मालखेड गावच्या हद्दीत सम्राट लॉजच्या समोर मोकळ्या जागेत हे दोघेजण मांडुळाची तस्करी करत होते. त्यावेळी कराड ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले.

सर्प तस्करांकडून सुमारे तीस लाख रुपये किंमतीचे एक रेड सॅण्डबो जातीचे मांडूळ आणि एक दुचाकी असा सुमारे तीस लाख तीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. पांडुरंग भगवान शिंदे (वय 34), जयवंत शंकर ताटे (वय 33, दोघेही रा. कासेगाव ता. वाळवा, जि. सांगली) अशी मांडूळ तस्करीप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

कारडमधील मालखेड गावाच्या हद्दीत सम्राट लॉजच्या परिसरात दोघेजण मांडूळ सापाची तस्करी करणार असल्याची बातमी पोलिसांना समजली. माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी मालखेड येथील सम्राट लॉज परिसरात सापळा रचला. सायंकाळी पाचच्या सुमारास पांडुरंग शिंदे आणि जयवंत ताटे हे दुचाकीवरुन तेथे आले. त्यांच्या गाडीला एक पिशवी अडकवलेली होती. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असलेली पिशवी उघडून पाहता त्यामध्ये एक डबा होता. त्याचे झाकण उघडून पाहिले असता त्यामध्ये एक काळपट रंगाचे सुमारे तीस लाख रूपये किमतीचे 64 सेमी लांबीचे आणि 8 सेमी जाडीचे मांडूळ जातीचा साप विक्री करण्याकरीता आणल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता लोक धनदौलत वाढावी या अंधश्रद्धेपोटी मोठ्या किंमतीला मांडूळ खरेदी करतात असे दोघा संशयितांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी पांडुरंग शिंदे आणि जयवंत ताटे या दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेत अटक  केली आहे. कराड ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.