दारुड्या मुलाकडून आई, बहिण आणि भावाच्या पत्नीसोबत गैरवर्तन, कुटुंबीयांकडून मुलाची हत्या

मध्य प्रदेशात एका कुटुंबाने आपल्या 24 वर्षीय दारुड्या मुलाची हत्या (family murdered alcoholic boy) केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दारुड्या मुलाकडून आई, बहिण आणि भावाच्या पत्नीसोबत गैरवर्तन, कुटुंबीयांकडून मुलाची हत्या

भोपाळ : मध्य प्रदेशात एका कुटुंबाने आपल्या 24 वर्षीय दारुड्या मुलाची हत्या (family murdered alcoholic boy) केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मुलाने दारुच्या नशेत आपल्या छोट्या भावाच्या पत्नीवर अत्याचार केला, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. सध्या कुटुंबातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे. सुशील जाटव असं मृताचे (family murdered alcoholic boy) नाव आहे.

कुटुंबानेच आपल्या दारुड्या मुलाची हत्या केल्याने मध्य प्रदेशात या हत्येची चर्चा सुरु आहे. सुशील दारुच्या आहारी गेला होता. तो दररोज दारु पित होता. दारु पिऊन घरी आल्यावर तो आई, बहिण आणि छोट्या भावाच्या पत्नीसोबत गैरवर्तन करायचा. त्यामुळे सर्वजण सुशीलच्या या वागणुकीला कंटाळले होते. त्यामुळे कुटुंबाने सुशीलची हत्या केली, असं सांगितलं जात आहे.

“मृत सुशीलच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतल्यानंतर घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती त्यांनी दिली. सुशीलचा मृतदेह गोपाळदास येथील डोंगराळ भागात मिळाला”, असं पोलीस अधिकारी गीता भारद्वाज यांनी सांगितले.

सुशीलचा मृतदेह 12 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आला. सुशीलची हत्या गळादाबून करण्यात आली होती, असं शवविच्छेदनातून उघडकीस आले. मृताची ओळख पटल्यानंतर समजले की, मृत मुलगा दारुडा होता. त्याला त्याचे घरातील सर्वजण कंटाळले होते. जेव्हा आम्ही त्याच्या कुटुंबीयाना विचारले तेव्हा त्यांनी हत्येची कबुली दिली. मृतक मुलगा दारु पिल्यानंतर आपल्या आई, बहिण आणि भावाच्या पत्नीसोबत गैरवर्तन करत होता. त्यामुळे त्याची हत्या केली, असं कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले, असं भारद्वाज म्हणाल्या.

“सुशील जाटवचे वडील कल्लू जाटव यांनी आपला गुन्हा कबुल केला. 11 नोव्हेंबरला सुशील दारु पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने आपल्या छोट्या भावाच्या पत्नीसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला”, असं सुशीलचे वडील कल्लू यांनी सांगितले.

“यापूर्वीही त्याने असं अनेकदा केले आहे. त्यामुळे आम्ही त्याची हत्या करत त्याचा मृतदेह गोपळदास डोंगरावरुन फेकून दिला”, असं कल्लू यांनी सांगितले.

दरम्यान, सुशीलच्या हत्येचा आरोपाखाली कल्लू, त्याची पत्नी, त्याचा छोटा मुलगा आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी चार अटक केलेल्या आरोपींना काल (18 नोव्हेंबर) कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *