व्यसनी वडिलांकडून 13 वर्षीय मुलीची विक्री, मुलीच्या पोटात चार महिन्यांचा गर्भ

राजस्थानमध्ये व्यसनी वडिलांनी आपल्याच मुलीला विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

व्यसनी वडिलांकडून 13 वर्षीय मुलीची विक्री, मुलीच्या पोटात चार महिन्यांचा गर्भ

जयपूर : राजस्थानमध्ये व्यसनी वडिलांनी आपल्याच मुलीला विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी वडिलांनी 13 वर्षाच्या मुलीला सात लाख रुपयांमध्ये (father sold daughter rajsthan) विकले. विशेष म्हणजे बालविवाहासाठी मुलीची विक्री केल्याचेही समोर आले आहे. ही घटना जून 2019 मध्ये घडली. पोलिसांनी आरोपी वडील आणि इतर दोघांना अटक (father sold daughter rajsthan) केली आहे. पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असून ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचेही समोर आले.

पीडित मुलगी सिवाना तहसील गावात राहत होती. तिचे वडील दारुच्या आहारी गेले होते. 22 जून रोजी गोपा राम माली नावाच्या व्यक्तीने आरोपी वडिलांना तुमच्या मुलीच्या लग्नासाठी चांगल्या घरातील मुलगा पाहिल्याचे सांगितले. त्याच्या सांगण्यावरुन आरोपी वडील मुलीला नवऱ्या मुलाला भेटवण्याच्या निमित्ताने सिवाना येथे घेऊन गेले. पण तेथून पुन्हा परतल्यावर त्यांच्यासोबत मुलगी नसल्याने कुटुंबीयांनी मुलगी कुठे आहे, अशी विचारणा केली. यावर आरोपी वडिलांनी तिला तिच्या मामाच्या घरी सोडलं आहे, असं सांगितलं. तसेच मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणानंतर 26 जून 2019 रोजी मुलगी मामाच्या घरी नसल्याचं समोर आलं. त्यानंतर आरोपी वडिलांनी तिचे अपहरण झाल्याचा बनाव केला. वडिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार कुटुंबीयांनी थेट पोलिस स्टेशनमध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी चौकशी केली असता मुलीची विक्री झाल्याचे समोर आले. बराचवेळ होऊनही मुलीचा शोध लागला नाही. त्यामुळे मुलीच्या काकाने थेट राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. याचदरम्यान मुलगी हैद्राबादमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीने पोलिसांचे एक पथक हैद्राबाद येथे गेले. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी भिकाऱ्याच्या वेशात मुलगी विकणाऱ्याला अटक केली. विशेष म्हणजे मुलीला ताब्यात घेतल्यानंतर ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, मुलीचे वडील आणि ज्या व्यक्तीला मुलगी विकली सांवला राम गुप्तासह आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *