महिला सरपंचाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, भाजप शहर अध्यक्षाची हकालपट्टी

"जे कुणी भाजपचा झेंडा घेऊन फिरतील, त्यांना घरात घुसून मारु" अशी धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनिल केदार (Congress Savner MLA Sunil Kedar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला सरपंचाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, भाजप शहर अध्यक्षाची हकालपट्टी
Follow us
| Updated on: Sep 16, 2019 | 8:41 AM

नागपूर : “जे कुणी भाजपचा झेंडा घेऊन फिरतील, त्यांना घरात घुसून मारु” अशी धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनिल केदार (Congress Savner MLA Sunil Kedar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिला सरपंचाविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजप शहर अध्यक्ष अनिल तंबाखे (BJP Anil Tambakhe) यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन नागपुरातील सावनेरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. दरम्यान या प्रकरणावरुन भाजपने अनिल तंबाखे (BJP Anil Tambakhe) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा येथे स्टार बसच्या उद्घाटनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र आयोजकांनी आपल्याला कार्यक्रमाचे निमंत्रणच दिले नाही, असा आरोप आमदार सुनिल केदार (Congress Savner MLA Sunil Kedar)  यांनी केला. त्यावरुन कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यात शाब्दिक वाद झाला.

यानंतर कार्यक्रमात भाषण करत असताना काँग्रेसचे (Congress) सावनेर येथील आमदार (Savner MLA) सुनिल केदार (Sunil Kedar) यांनी भाजप (BJP) कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. “जे कुणी भाजपचा झेंडा घेऊन फिरतील, त्यांना घरात घुसून मारू.” असे धमकीवजा वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नागपुरातील (Nagpur) सावनेरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

यानंतर भाजपचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी सुनिल केदार यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर सुनिल केदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल तंबाखे यांची भाजपातून हकालपट्टी

तर दुसरीकडे याच कार्यक्रमात भाजप शहर अध्यक्ष अनिल तंबाखे (BJP Anil Tambakhe) यांनी सरपंच प्रमिला बागडे यांच्याविरुद्ध अश्लील भाषेचा वापर केला होता. त्यामुळे तंबाखेंविराधोत महिला सरपंचाविरोधात चुकीच्या शब्दाचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तंबाखे यांची भाजपमधूनही हकालपट्टी करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.