चकमकीत 5 जहाल नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली पोलीस दलाला अभूतपूर्व यश

पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे

चकमकीत 5 जहाल नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली पोलीस दलाला अभूतपूर्व यश
Follow us
| Updated on: Jan 29, 2020 | 8:11 PM

गडचिरोली : पेरिमिलीभट्टी जंगल (Perimili bhatti forest) परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे (Gadchiroli Naxal Arrest). अबुजमाड जंगल परिसराचा भाग समजल्या जाणाऱ्या परिसरात गडचिरोली पोलीस दलाला अभूतपूर्व यश आलं आहे. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन नक्षली कुटूल, नक्षल दलम सदस्य आहेत, तर तीन जनमिलिशिया म्हणून कार्यरत असलेले नक्षलवादी आहेत (Gadchiroli Naxal Arrest).

उपविभाग भामरागड हद्दीत येणाऱ्या उपपोलीस स्टेशन लाहेरी पासुन 35 किमी अंतरावर असलेल्या आणि छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या मौजा पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी 60 चे जवान (C-60 Commandos) नक्षलविरोधी अभियान राबवत होते. या अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेनं गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी नक्षवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत गोळीबार केला.

पोलिसांनी गोळाबार करताच नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सी 60 कामांडोनी नक्षलवाद्यांचा शौर्यपूर्ण पाठलाग केला आणि पाच जहाल नक्षलवाद्यांना पकडले. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये रैणू सोनू वड्डे, बंडू चक्कु वड्डे, सुखराम सोमा उसेंडी, दोघे इरपा उसेडी आणि केये सायबी वड्डे यांचा समावेश आहे. पोलिसांनी या नक्षलवाद्यांकडून तीन बंदुकी जप्त केल्या आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.