गोव्यातून महाराष्ट्रात येणारी विदेशी दारु जप्त, दारुची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त

नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने लोणावळ्याजवळील कुसगाव टोलनाक्यावर मोठी (liquor seized in pune) कारवाई केली आहे.

गोव्यातून महाराष्ट्रात येणारी विदेशी दारु जप्त, दारुची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त
Follow us
| Updated on: Dec 22, 2019 | 8:42 PM

पुणे : नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने लोणावळ्याजवळील कुसगाव टोलनाक्यावर मोठी (liquor seized in pune) कारवाई केली आहे. गोवा येथून महाराष्ट्रात येत असलेल्या कंटेनरची झडती घेत हा विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. विदेशी दारूचे दोन हजार बॉक्स असा एकूण 1 कोटी 46 लाख 81 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. राजेश कुरुवाट, विजित कानीकुलथ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे (liquor seized in pune) आहेत.

राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाला गोव्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आणला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून हा मद्यसाठा आणला जाणार होता. हा मद्यसाठा जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून नेण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार कुसगाव पथकर वसुली नाका येथे पोलिसांनी सापळा रचला. रविवारी पहाटे पथकर नाक्यावर 14 चाकी कंटेनर आला. पोलिसांनी या कंटेनरला तपासणीसाठी थांबवले. कंटेनरमध्ये असलेल्या मालाविषयी चालकाकडे माहिती विचारली. तसेच त्याची कागदपत्रे (liquor seized in pune) मागितली.

त्यावेळी चालकाने म्हापसा गोवा येथून सिरॅमिक प्लास्टिकच्या वस्तू भरल्या आहेत असे त्याने सांगितले. या वस्तू ओशिवरा मुंबईत या ठिकाणी नेत आहे. त्याचवेळी राज्य उत्पादन शुल्कच्या दुसऱ्या पथकाने कंटेनरवरील क्लीनरला ही माहिती विचारली असता, त्याने या प्लास्टिकच्या वस्तून नांदेडकडे जाणार असल्याचे सांगितले.

चालक आणि क्लीनरच्या माहितीत तफावत आढळल्याने पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली. त्यावेळी कंटेनरमध्ये गोवा बनावट विदेशी मद्याचे दोन हजार बॉक्स आढळले. पोलिसांनी हा मद्यसाठा आणि कंटेनर असा एकूण एक कोटी 46 लाख 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला (liquor seized in pune) आहे.

यानंतर कंटेनर चालक आणि क्लीनर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच याप्रकरणी वाहन मालक, मद्यसाठा पुरवठादार, वाहतूकदार, मद्य खरेदीदार व गुन्ह्याशी संबंधित असलेल्या इतर इसमांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.