निलंबित IPS अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेप

न्यायालयीन कोठडीत असताना आरोपी प्रभुदास माधवजी वैश्नानी यांचं निधन झालं. त्यानंतर तत्कालीन एएसपी संजीव भट्ट आणि त्यांच्या सहकऱ्यांवर कोठडीत आरोपींना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.

निलंबित IPS अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेप

गांधीनगर (गुजरात) : कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्याला दोषी ठरवून, कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

1990 साली जामनगरमध्ये ‘भारत बंद’च्या दरम्यान हिंसा झाली होती. आयपीएस संजीव भट्ट त्यावेळी जामनगरचे एएसपी होते. या बंद दरम्यान 133 जणांना पोलिसांनी अटक केली होती. यातील 25 जण जखमी झाले होते आणि आठ जणांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

न्यायालयीन कोठडीत असताना आरोपी प्रभुदास माधवजी वैश्नानी यांचं निधन झालं. त्यानंतर तत्कालीन एएसपी संजीव भट्ट आणि त्यांच्या सहकऱ्यांवर कोठडीत आरोपींना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. संजीव भट्ट आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रारही दाखल झाली. मात्र, गुजरात सरकारने खटला चालवण्यास परवानगी दिली नव्हती. त्यानंतर 2011 साली राज्य सरकारने संजीव भट्ट यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली.

बुधवारी, 12 जून रोजी सुप्रीम कोर्टाने संजीव भट्ट यांच्या याचिकेवर पुनर्विचार करण्यास नकार दिला. भट्ट यांनी याचिकेद्वारे साक्षीदारांची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टातील न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने संजीव भट्ट यांची मागणी फेटाळली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *